आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या नातलगांची पर्स शोधण्यास लोहमार्ग पोलिसांची तीन पथके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नातलग असलेल्या महिला प्रवाशाची पर्स दोन दिवसांपूर्वी हावडा ते पुणेदरम्यान धावणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसमधून चोरीला गेली. मंत्र्यांचे नातलग असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तीन पथके तयार करून चाेरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर मात्र जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. 

मीना सुभाष हारपुरे (रा. पुणे) या आपल्या आईसमवेत शनिवारी हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ए-वन डब्यातील २३ क्रमाकांच्या बर्थवरून अकोला ते पुणे असा प्रवास करत होत्या. प्रवास रात्रीचा होता. पहाटे पाचच्या सुमारास त्यांना जाग आल्यानंतर आपली पर्स नसल्याचे कळाले. पर्सची चोरी झाल्याचे समजताच त्यांनी दौंड रेल्वे स्थानकावर उतरून दौंड लोहमार्ग पोलिसांत पर्स चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणाऱ्या महिला या जावडेकर यांच्या नातलग असल्याचे कळताच पोलिसांनी हालचाल सुरू केली. 

चोराचा शोध घेण्यासाठी आरपीएफ, लोहमार्ग स्थानिक पोलिसांची पथके तयार करण्यात आले. अकोला ते दौंडदरम्यान रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची चौकशी सुरू झाली. संशयित व्यक्तीचे मोबाइल लोकेशन तपासण्याचे काम सुरू आहे. घटना घडल्यापासून १२ तासांच्या आतच एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. नंतर मात्र त्यास सोडून देण्यात आले. ३३ हजार रोख रुपये, १२ ग्रॅम सोन्याचे दागिने मोबाइल असा एेवज चोरीला गेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

आझाद हिंदएक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाची पर्स चोरीची घटना घडली आहे. घटनेचा तपास सुरू असून, पथके तयार करून विविध ठिकाणी पाठवण्यात अाली आहेत. लवकरच चोराला अटक करू.
- प्रभाकर बुधवंत, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पाेलिस, पुणे 
बातम्या आणखी आहेत...