आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक कचऱ्यामुळे वणव्याच्या घटना, अभयारण्यातील औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 उत्तर सोलापूर- उत्तर तालुक्यातील शेकडो एकर वनसंपदा जळून खाक झाली तरी वनविभागाला जाग आलेली दिसत नाही. पंचनाम्याच्या कारवाईच्या पुढे अद्याप विभाग गेलाच नसल्याचे दिसत आहे. टाकाऊ रासायनिक कचऱ्याने तालुक्यातील माळढोक अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. राजरोसपणे चालणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा मात्र आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत अक्षम्य डोळेझाक करत आहेत. या प्रकारामुळे वन्यजीवांबरोबर परिसरातील शेतीही धोक्यात अाली आहे. 
 
उत्तर तालुक्यातील नान्नज परिसरातील नवीन माळढोक अभयारण्याचा काही भाग आैद्योगिक वसाहतीच्या जवळ आहे. या औद्याेगिक वसाहतीतील काही उद्योगातून मोठ्या प्रमाणात राख, टाकाऊ साचे आदी कचरा तयार होतो. हा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक वाहतूकदारांना दिला जातो. हे वाहतूकदार या कचऱ्यातून जळालेला कोळसा, लोखंडाचे तुकडे मिळवतात राहिलेला कचरा सरळ अभयारण्यात टाकून देतात.
 
या औद्योगिक साचलेल्या कचऱ्यामुळे अभयारण्यात वणवा पेटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या कचऱ्याच्या वासाने हरणासारखे तृणभक्षी प्राणी परिसर सोडून जात आहेत. याशिवाय वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतीचे नुकसान होत असल्याचे संतोष लामकाने यांनी सांगितले. 
 
ना-हरकतदेण्यात अग्रेसर 
वन्यजीवसंवर्धनाची जबाबदारी झटकणारे वन विभाग वन्यजीव विभाग उद्योग व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी मात्र फार चोख बजावताना दिसतात. वनक्षेत्रात चालणाऱ्या वन्यजीव उपयोगी कामावर, ठेकेदारावरही त्यांचे चांगलेच लक्ष असते. यातूनच गेल्या वर्षी नान्नज वन्यजीव परिक्षेत्राचे अधिकारी घरी गेले. काही दिवसापूर्वी कर्तव्यदक्ष मुख्य वनसंरक्षक बडवे यांची बदली झाली. त्यावेळी कार्यालयाच्या आवारात फटाके फोडण्यात आले. यावरून वन विभागाचे कामकाज दिसून येते. 
 
-वणवा लागलेले क्षेत्र अद्याप आमच्या ताब्यात दिलेले नाही. ते क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याने आमचा संबंध नाही. सचिनजोशी, वनपाल नान्नज वन्यजीव परिक्षेत्र. 
 
बातम्या आणखी आहेत...