आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागेतील बालके मृत्यूप्रकरणी गवळी समाजाचा निघाला मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - चंद्रभागा नदीत बुडून बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी प्रांताधिकारी आणि सामान्य रुग्णालय अधीक्षकांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी पंढरपुरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शहरातील समस्त गवळी समाजाने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला शहरातील सर्व सामाजिक, राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. 
 
चंद्रभागा नदीत गवळी समाजातील चार बालके नुकतीच मृत्यू पावली. या घटनेस चंद्रभागेतून होत असलेला अवैध वाळू उपसा कारणीभूत असून चार बालकांचा मृत्यू हा चंद्रभागा नदीत होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे झालेला आहे. त्यामुळे या अवैध वाळू उपशाला जबाबदार धरून तहसीलदार,मंडल अधिकारी तलाठी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावेत.चंद्रभागा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्यात यावा, अशी मोर्चेकर्ऱ्यांची मागणी होती. 

चंद्रभागानदीतून होणाऱ्या वाळू उपशाची जबाबदारी निश्चित करून यापुढे वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी निश्चित करणारा कायदा करण्यात यावा. उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. दुर्घटना ग्रस्त कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपयांची अर्थिक मदत मुख्यमंत्री निधीतून तत्काळ जाहीर करण्यात यावी.प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

या मोर्चात गवळी समाजातील महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चास वारकरी सांप्रदाय पाईक संघ,अखिल भारतीय छावा संघटना,कोळी महासंघ,संभाजी ब्रिग्रेड पंढरपूर शहर,युवा भीमसेना,अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, महादेव कोळी समाज संघ, यशवंत सेना, बारा बलुतेदार महासंघ, विश्‍व हिंदू परिषद, पंढरपूर शहर शिवसेना, हिंदू महासभा, लिंगायत प्रतिष्ठान, महर्षी वाल्मीकी संघ,पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, विक्रम शिरसट मित्र मंडळ, अखिल महाराष्ट्र रामोशी समाज कृती समिती,अदिम विकास परिषद आदी मान्यवर उपस्थित होते. 

जीवनरक्षकांची नियुक्ती करा 
चंद्रभागेच्यावाळवंटात कायमस्वरूपी लाइफ गार्ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या भाविकांचा विमा उतरण्यात यावा आदी मागण्यांसाठी पंढरपूर शहर तालुका गवळी समाजाच्या वतीने येथील प्रांत कार्यालयावर विराट निषेध मोर्चा काढण्यात आला. 

 
बातम्या आणखी आहेत...