आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराला भेटू देत नसल्याने बहिणीने भावाच्याच बाळाचे केले अपहरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर - प्रियकरला भेटण्यास मज्जाव केल्यामुळे चक्क भावाच्या दहा महिन्यांच्या मुलालाच बहिणीने तिच्या सहकाऱ्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस अाली अाहे. 
 
त्रिवेणी विनय तोष्टाचार्य (वय २७, रा. अशोकनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत तक्रार दिली अाहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, रविवारी पहाटे अडीचच्या सुमाराला पोलिसात तक्रार देण्यात अाली अाहे. 
 
प्रियंका काळप्पा कंबार (वय २४, रा. यरगट्टी, बेळगाव), इरय्या मृत्युंजय हिरेमठ (सौंदत्ती, बेळगाव), मंजुनाथ विठ्ठल हुरकनवर (रा. बेनकट्टी, बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. अार्यन तोष्टाचार्य (वय १० महिने) याचे अपहरण झाले अाहे. 
 
त्रिवेणी यांची नणंद प्रियंका कंबार, चुलत सासू द्राक्षायणी हे अार्यन याला बाहेर फिरवून अाणतो म्हणून घेऊन गेले. यानंतर प्रियंका तिचा प्रियकर इरय्या हिरेमठ यांनी संगनमताने पळवून नेले अाहे. प्रियंकाला तिचा प्रियकर इरय्या याला विनय तोष्टाचार्य भेटू देत नव्हते. त्यांचे भेटणे त्याला पसंत नसल्याने तो याला विरोध करत होता. यामुळे तिच्या मनात याविषयी राग होता. याच कारणावरून मुलाला सगळ्यांनी मिळून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र उशिरे तपास करीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...