आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : कचरा सफाईच्या जुन्या गाड्या पडून, नव्या गाड्यांची खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे बंद गाड्या पडून आहेत. दुसरीकडे नव्या कचरा गाड्यांचे नारळ फोडून स्वागत करण्यात येत आहे. - Divya Marathi
एकीकडे बंद गाड्या पडून आहेत. दुसरीकडे नव्या कचरा गाड्यांचे नारळ फोडून स्वागत करण्यात येत आहे.
सोलापूर - कचरासफाईच्या जुन्या गाड्या देखभालीअभावी धूळखात आहेत. तर त्यांची दुरुस्ती करून वापरात अाणण्याऐवजी नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. हा सगळा मामला शासनाच्या पैशाचा अपव्यय करणारा असल्याचे समोर येऊ लागले अाहे. प्रशासन या प्रश्नावर कधी गंभीर होणार, हा खरा प्रश्न अाहे. 

१२ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १२ आरसी गाड्या, दोन रोड स्वीपर, १४ वे वित्त आयोगातून ७० घंटागाड्या मागील काळात खरेदी करण्यात आल्या. त्या गाड्या महापालिकेच्या डेपोत तशाच पडून अाहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडलेले अाहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली योजना अाणल्या गेल्या. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. 
नव्याने पुन्हा १४ व्या वित्त आयोगातून आरसी गाड्या, ३५ घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या अाहेत. त्यातील आठ आरसी गाड्यांचे पूजन महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले. नव्याने आलेल्या वाहनाशिवाय डंपर, तीन सेप्टी टँक साफ करण्यासाठी गाड्या अशा १३९ गाड्या आहेत. यापैकी २१ वाहने बंद आहेत. 
३५ घंटागाड्या येणार आहेत. ८३ वाहने सध्या आहेत. वाहनांवर सुमारे दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होत आहे. तरीही शहरातील कचरा साफ होत नाही. जुनी वाहने २००८ मध्ये खरेदी केलेली आहेत. ती वारंवार बंद पडत आहेत. 
 
नव्या वाहनांची गरज 
- नवीन वाहनेखरेदी केली. कचरा मक्ता स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली. त्यामुळे शहरातील कचऱ्याबाबत प्रश्न निकाली निघाला. नव्याने आलेल्या वाहनांमुळे कचरा वाहतूक करता येईल. नवीन आणि जुनी वाहने मिळून शहरात कचरा निर्मूलन होईल.
” अभिजितहरळे, सहायक आयुक्त महापालिका 
 
जुन्या गाड्यांची दुरुस्ती नाही 
कचरा उचलण्यासाठी जुन्या गाड्या बुधवार पेठ परिसरात आरोग्य विभागाच्या कार्यालयात. रोड स्वीपर डफरीन हाॅस्पिटल आवारात पडून आहेत. 

कचऱ्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ 
कोट्यवधी रुपये गाड्या खरेदी करण्यावर महापालिकेचा भर आहे. ११७ वाहने खरेदी करूनही शहरातील कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. हद्दवाढ भागातील आयएमएस शाळेजवळ, विडी घरकुल परिसर, शहरातील गावठाण भागात कचरा दिसून येतो. ११७ वाहने ३५० टन कचरा उचलू शकत नसल्याचे चित्र आहे. 
 
३५ घंट्यागाड्या येणार आहे 
शहरातील कचरा उचलण्याच्या टेंडर प्रक्रियेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवली असून, तसे पत्र महापालिकेस मिळाले. त्यानुसार महापालिका कचरा टेंडर प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामुळे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या गाड्या मक्तेदारांना भाड्याने देण्यात येणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा ,चार कोटी १५ लाखांची खरेदी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...