आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहाची नाणी नाकारल्यास थेट ट्रेझरीकडे तक्रार करा! चलनातून बंद झाल्याची केवळ अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दहारुपयांची नाणी चलनातून रद्द झाल्याची निव्वळ अफवा आहे. रिझर्व्ह बँकेने तशी कुठलीच सूचना दिलेली नाही. नोटाबंदीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात नाणी उपलब्ध झाली. ती घेण्यास कोणी नकार दिला तर थेट स्टेट बँकेच्या ट्रेझरी कार्यालयाकडे तक्रार करा, असे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, रिक्षाचालक १० रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याची बाब निदर्शनास आली. पाच रुपयांची नाणी मात्र गुमान घेत आहेत. याबाबत कुठलेच स्पष्टीकरण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँकेच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाेटाबंदी झाली. त्यानंतर चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. कॅशलेस व्यवहार वाढवण्यासाठी नाेटांपेक्षा नाणी अधिक उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाजारात पाच आणि दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. परंतु अलीकडेच दहाची नाणी चलनातून रद्द केल्याची अफवा उठवण्यात आली. त्याने सामान्य माणूस संभ्रमात पडला. 

पाचच्या नाण्यांपासून ब्रेसलेट बनवण्याचा प्रकार उघडकीस अाला होता. चलनी नाण्यांचा हा गैरवापर आहे. तसे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. 

ग्राहक घेत नाहीत 
पतसंस्था चालवतो. तिथेच वीज बिल भरणा केंद्रही अाहे. त्यामुळे पाच-दहाची नाणी घेतो, देतो. पण अलीकडे काही ग्राहकांनी घेण्यास नकार दिला. ती नाणी चलनातून रद्द झाल्याचे सांगितले. मला आश्चर्य वाटले.” 
- इरेशबेले, पतसंस्था चालक 

ही केवळ अफवाच 
दहाची नाणी घेत नसल्याचे आम्हीही ऐकले. ती चलनातून रद्द होण्याचे कारण नाही. तशी सूचना रिझर्व्ह बँकेनेही केलेली नाही. ती घेण्यास कोणी नकार दिला तर ट्रेझरीकडे रीतसर तक्रार करा, कारवाई होईल.” - विश्वनाथअामणे, व्यवस्थापक, विदर्भ कोकण बँक 
बातम्या आणखी आहेत...