आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, केंद्र राज्य सरकारवर आमदार पाटील टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा- जगाचापोशिंदा असणारा शेतकरी सध्या अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. वेळेवर पाऊस झाल्याने दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या महाराष्ट्रातील १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजप-शिवसेनेचे युती सरकार गाढ झोपेत असल्याचे सोंग घेत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरलेच पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील, असा इशारा औसाचे आमदार बसवराज पाटील यांनी दिला.

उमरगा येथील तहसील कार्यालयावर गुरुवारी (दि. १३) दुपारी वाजता उमरगा, लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन बापूराव पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, युवानेते शरण पाटील, जिल्हा सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, जि. प. माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील हुतात्मा स्मारकावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरून तहसील कार्यालयापर्यंत भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आमदार बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील यांनी बैलगाडीत बसून मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी शंभर बैलगाड्या शेकडो कार्यकर्ते, शेतकरी बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदविला.

अामदार पाटील म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात केवळ "तु तु मै मै' करण्याशिवाय काहीच ठोस निर्णय घेत नाहीत. निवडणुकीच्या काळात खोटे बोलून जनतेची दिशाभूल करून सरकार सत्तेवर आले. मात्र, आता समाजातील कुठल्याही घटकासाठी ठोस निर्णय घेतले जात नाहीत. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि पुन्हा सत्तेच्या हव्यासापोटी सरकारमध्ये सहभागी झाले, हे धूर्त राजकारणी आहेत. जनतेच्या प्रश्नांशी यांना देणे-घेणे नाही. या मोर्चामध्ये उमरगा तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, लोहारा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पवार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अॅड. दिलीप सगर, युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष विजय वाघमारे, जि. प. सदस्य दिलीप भालेराव, बाबुराव राठोड, प्रकाश आष्टे, पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला, तुगावचे माजी सरपंच विकास हराळकर, नगरपालिका गटनेते सतीश सुरवसे आदींनीही सहभाग घेतला. सूत्रसंचालन रामकृष्णपंत खरोसेकर तर आभार विजयकुमार सोनवणे यांनी मानले. यावेळी शासनाच्या विरोधात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. अनेक वर्षांतील काँग्रेसचे तालुक्यातील दमदार आंदोलन झाले.

खासदार, आमदार निष्क्रिय
दुष्काळातखासदार दिसायला तयार नाहीत, तर आमदार चौगुले भेटायला तयार नाहीत. निवडणुकीत लोकांच्या पाया पडत फिरणारा आमदार निवडून आल्यावर कोठे गायब झाला, असा प्रश्न उपस्थित केला. लोकांसाठी वेळ देता येत नसेल तर तुमच्या खुर्च्या खाली करू, असे पाटील म्हणाले.

खोटे बोलून राज्य करणे सोपे नाही
मोदीसरकारने गुजरातसारखी प्रगती करू, असे अाश्वासन दिले होते. खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकता येतात. मात्र, खोटे बोलून राज्य करणे सोपे नाही. सध्याचे सरकार हे निष्क्रिय सरकार आहे. देशाच्या इतिहासात सध्याच्या पंतप्रधानाएवढा खोटे बोलणारा माणूस मिळणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
या आहेत प्रमुख मागण्या
-शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे.
-शेतकऱ्यांचे कर्ज वीजबिल माफ करून मोफत वीजपुरवठा करावा.
-मजुरांच्या हाताला काम, चाराडेपो पाण्याची सोय करावी.
-विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करावी.