आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार खात्यात चुकांची जंत्री, बाजू मांडणार अधिकारी! सचिव मांडणार योजनांची योग्य बाजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कुठल्याही निर्णयाचा शासन आदेश (जीआर)निघाला की, तो सर्वोच्च समजला जातो. त्यावर प्रशासनाची अंमलबजावणी निश्चित होते. परंतु अशा आदेशावरही संबंधित मंत्र्यांना सारवासारव करावी लागणे, हा गलथानपणाचा कळसच म्हणावा लागेल. अशा पद्धतीच्या असंख्य चुका सहकार खात्यात घडल्या. चक्क शासन आदेशच सुधारित काढावा लागला, शेतकरी कर्जमाफीतील याद्या मागे घ्याव्या लागल्या. या नामुष्कीवर शासनाची बाजू मांडण्यासाठी चक्क सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. 


होय, हा प्रकार खरा वाटणार नाही. परंतु २४ नोव्हेंबरला याबाबतचे स्वतंत्र आदेश काढून सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या अधिकाऱ्यांचे काम निश्चित केले आहे. सहकारावर अवर सचिव (पतसंस्था), पणनवर उपसचिव तर वस्त्रोद्याेगविषयी सहसचिव ही मंडळी आता बाजू मांडतील. शासन राबवत असलेल्या विविध योजना आणि नियमित कामकाजाविषयी प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर त्यांनी बाजू मांडायची आहे. शासन निर्णय आणि अंमलबजावणीत चुका, तक्रारी या नित्याची बाबी आहेत. त्यावर शासन स्तरावर दखल घेणे साहजिक अाहे. परंतु त्याबाबत बाजू मांडण्यासाठी अधिकारी नियुक्त करणे हे पहिल्यांदाच घडत असावे. 


कर्जमाफीच्यायाद्या गडप होणे, प्रकटणे 
छत्रपतीशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचेही असेच झाले होते. त्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइनवर झाली. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या. ते इंग्रजीत होते, त्यात प्रचंड चुका होता, आकडेवारीत तफावत होती. त्याची बोंब झाली, अन् याद्या संकेतस्थळावरून गडप झाल्या. पुन्हा प्रकटल्या, त्यातही चुकाच चुका. अखेर टप्पे ठरवून पैसे पाठवले. त्या रकमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. 


बँकांचे विलीनीकरण, जीआर अन् खुलासा 
राज्यातीलकमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरणासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा शासन आदेश नोव्हेंबरला प्रसिद्ध झाला. त्याने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विलीनीकरणाचा विषयच नसल्याचा खुलासा करत सारवासारव केली. त्यानंतर नोव्हेंबरला सुधारित आदेश काढावा लागला. त्यातून विलीनीकरणाचा विषय काढून टाकला होता. 

बातम्या आणखी आहेत...