आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्डुवाडी पालिका निवडणुकीत साडेतीन ते चार कोटींचा चुराडा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी - गटात असणाऱ्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांच्या नगराध्यक्ष पदांच्या अपक्ष नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मिळून तीन ते चार कोटी रुपयांचा चुराडा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झाल्याचा अंदाज एका सर्वेक्षणानुसार पुढे आला आहे. कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वाभिमानी-रिपाइं आघाडी यांच्यात प्रामुख्याने लढत झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. तर एका अपक्ष उमेदवाराने येथे बाजी मारली.

नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये शिवसेना १७ स्वाभिमानी-रिपाइं आघाडी १७ तर भाजप तर राष्ट्रवादी यांनी उमेदवार तर इतर अपक्ष उमेदवार उभे होते. एका संस्थेच्या सर्वेक्षणानुसार या निवडणुकीच्या चिन्ह वाटपापासून ते मतदानापर्यंत उमेदवारांनी तीन ते चार कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा आकडा समोर आला आहे. निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदासाठी पाच लाख रुपये तर नगरसेवक पदासाठी तीन लाख रुपये खर्च मर्यादा घालून दिली होती. परंतु यापेक्षा हा आकडा पुढे गेल्याचे दिसून आले. या निवडणुकीत हॉटेल व्यवसायाची दररोज दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. तर प्रोजेक्टर पथनाट्य, सभा, पदयात्रा, मोटारसायकल रॅली यावरही मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. पदयात्रांसाठी दोनशे ते आडीचशे महिलांना एका पदयात्रेत दोनशे रुपये हजेरीने आणण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण दहा ते बारा सभा घेण्यात आल्या होत्या. तर ९४ वाहनांचा प्रचारासाठी वापर करण्यात आला. दररोज दोन ते तीन हजार प्रत्येक वाहनावरती खर्च झाल्याचे दिसून आले. लाखो रुपयांचा खर्च या प्रचारादरम्यान वाहनांवर करण्यात आला. दहा ते बारा दिवसांत साडेतीन ते चार कोटी रुपयांचा चुराडा झाला असल्याचे अनुमान लावण्यात येत आहे.

चिन्हांच्या मतपत्रिका, गाड्यांचे स्टिकर, प्रोजेक्टर, पथनाट्य, जाहीरनामे, वचननामे, बॅचबिल्ले, मफलर, फटाके, पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या, पाणी बॉटल, जेवनावळी, दारू, चहा, नाष्टा, पेट्रोल, डिझेल, मोटारसायकल, चार चाकी वाहन, भाडोत्री कार्यकर्ते यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक मतदाराला चार ते पाच हजार रुपये उमेदवारांनी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे जाणकार व्यक्तींनी शक्यता व्यक्त केली.

गोखले इन्स्टिट्यूट
पुण्याच्यागोखले इन्स्टिट्यूट अॉफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने सर्वेक्षणाचे कार्य हाती घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील निवडक २० नगरपालिका निवडण्यात आल्या. निवडणूक खर्चासंबंधी सर्व्हे करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी मैंदर्गी नगरपालिका निवडणुकीच्या खर्चाविषयी सर्व्हे करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...