आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहून गेलेल्या पतीचा मृतदेह कनळी बंधाऱ्याजवळ तर पत्नीचा नळेत सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  भीमा नदीवरील अजनसोंड-मुंढेवाडी बंधाऱ्यावरून गुरुवारी सायंकाळी दुचाकीसह वाहून गेलेल्या बनकर दांपत्यापैकी सुरेश बनकर यांचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुंढेवाडी बंधाऱ्यापासून 10 किमी लांब कनळी बंधाऱ्याजवळ सापडला. तर वंदना बनकर यांचा मृतदेह दुपारी 12 वाजता चळे येथे सापडला, sdrf च्या पथकांनी शोधला मृतदेह.तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी ही माहिती दिली. सुरेश यांंच्या पत्नी वंदना बनकर यांचा शोध घेण्यासाठी धुळे येथील एसडीआरएफचे (स्टेट डिझास्टर रीलिफ फोर्स) ३० जवान शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

गुरुवारी रात्री शुक्रवारी दिवसभर पंढरपूर तहसील कार्यालय पोलिस प्रशासनांकडून शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र प्रशिक्षित टीम नसल्याने विसर्गात वाढ झाल्याने अडचणी येत होत्या. शुक्रवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे सुरेश बनकर यांचा मृतदेह हाती लागला. रात्री उशिरा एसडीआरएफचे पथक पोहोचणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली. आपत्कालीन मदत यंत्रणेकडून बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या बनकर कुटुंबीयांना आठ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयास सादर केला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर बनकर कुटुंबास आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
 
अनवली येथे करणार होते मुक्काम 
वंदना(रा. पुजारवाडी, ता. सांगोला) यांच्या मावशीला भेटण्यासाठी हे दांपत्य फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथे गेले होते. तेथून वंदना यांचे माहेर अनवलीकडे मुक्कामाला जाताना ही दुर्घटना घडली. उजनी धरणातून भीमा नदीत विसर्गामुळे अजनसोंड -मुंढेवाडी बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. पाण्याचा अंदाज आल्याने दोघेही दुचाकीसह वाहून गेले. शुक्रवारी दिवसभर शोध सुरू होता. 
 
एसडीआरएफची टीम दाखल 
जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेची माहिती मंत्रालयातील आपत्कालीन यंत्रणेस कळविली. मंत्रालयांकडून धुळे एसडीआरएफ पथकाला तातडीने सोलापूरला रवाना होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार धुळे येथील एसडीआरएफचे पथक शुक्रवारी सकाळीच सोलापूरला रवाना झाले. रात्री उशिरा हे पथक घटनास्थळी पोहोचले. अंधार विसर्गात वाढ झाल्याने शाेधमोहीम राबवता आली नाही. शनिवारी सकाळी शोधमोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी सांगितले. या पथकात चार अधिकारी २९ कर्मचारी आहेत. या शिवाय अत्याधुनिक होड्या, पाणबुड्या आणि पाण्यामध्ये शोध घेण्यासाठीची लागणारी आधुनिक यंत्रणादेखील त्यांच्याकडे आहे. 
बातम्या आणखी आहेत...