आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी‑माजी नगरसेवकांचा प्रताप, पोलिसास केली मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी पोलिस सुनील राठोड - Divya Marathi
जखमी पोलिस सुनील राठोड
सोलापूर- सोलापूर नगरसेवकासहनऊ जणांनी मिळून काठी, ब्लेड आणि लाथाबुक्क्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी कुमठे येथे घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास गुन्हे शाखेतील पोलिस सुनील राठोड (रा. कुमठे तांडा) हे आयुक्तालयाकडे ड्युटीवर रूजू होण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. गावातील चौकात आल्यानंतर नगरसेवक इस्माईल शेख यांच्यासह नऊ जणांनी मिळून मारहाण करत ३७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज काढून घेतला, अशी फिर्याद श्री. राठाेड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. यावरून नगरसेवकांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नगरसेवक शेख, जावेद शेख, शकील शेख याच्यासह सहा जणांनी राठोड यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल, सोन्याचा ब्रासलेट आणि रोख दहा हजार रुपये काढून घेतले. राठोड यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
शिवसेनेचेमाजी नगरसेवक राजू भिंगारे यांच्या शाहीर वस्ती येथील घरात मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला असता, लाख ९४ हजार रुपये मिळाले. भिंगारे यांच्यासह जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामिनावर सोडूनही दिले. याबाबत पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
राजू विठ्ठल भिंगारे (वय ४२, रा. ५५/६१, शाहीर वस्ती, भवानी पेठ), गणेश सुभाष नाटेकर (वय ४२, शाहीर वस्ती), मणिकांत कांतिलाल पंडित (वय ६३, रा. समाचार चौक), संजय मोहन गायकवाड (वय ४३, रा. बेगम पेठ), राजू धोंडिबा फाळके (वय ४६, रा. दहिटणे), शंकर मल्लप्पा हवले (वय २८, रा. विडी घरकुल) अशी अटक अाणि सुटका झालेल्यांची नावे आहेत.

कारवाई संपली...
अटककेलेल्यांवर मुंबई जुगार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. त्यानंतर लगेच जामिनावर मुक्तताही करण्यात आली. दाखल गुन्ह्याप्रमाणे कारवाई झाली. त्यामुळे त्यांना सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर आल्यापासून मटका बंद आहे. परंतु काही बडी मंडळी स्वत:च्या घरातून हा धंदा सुरूच ठेवला.