आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मानलेल्या जावयाचा प्रताप' मारला 16 तोळे दागिने, 9.5 लाखांवर डल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोलकरीण तरुणीला मुलगी मानले. तिचे लग्नही लावून दिले. जावयाला घरी आसरा दिला. पण, या जावयाने कृतघ्नपणाचा कळस गाठत घरात ठेवलेले १६ तोळे दागिने आणि ९.५ लाख रुपयांवर डल्ला मारला. विजापूर रोडवरील जनता बँकेच्या शेजारील सीए मदन रावत यांच्या घरात ही चोरी झाली. पोलिसांनी चोरट्या जावयाला अटक केली असून, त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 
 
श्री. रावत यांना एक मुलगा असून, तो कर्नाटकात शिकत आहे. मुलगी नसल्यामुळे घरातील मोलकरणीलाच त्यांनी मुलगी मानून घरातच राहण्यास अासरा दिला होता. तिचे लग्नही लावून दिले. पतीबरोबर पटल्याने ती पुन्हा रावत यांच्याकडेच राहू लागली. काही दिवसांनी दुसऱ्यासोबत विवाह झाला. पण, नवीन जावयाने पत्नीला रावत यांच्याच घरी ठेवले. त्याची नेहमी घरात ये-जा होती. अगदी जावईसारखीच स्थिती. याचाच गैरफायदा घेऊन त्याने सोन्याचे दागिने आणि कामानिमित्त ठेवलेली रक्कम पळवली. 
 
अमोल श्रीनिवास अाडकी (वय २२, रा. भवानीपेठ) असे संशयित चोरट्या जावयाचे नाव अाहे. महानंदा रावत यांनी विजापूर नाका पोलिसांत तक्रार दिली अाहे. 
 
फसवणूक आणि चोरीचा गुन्हा 
तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे म्हणतात, लोभापायी अमोलने हे कृत्य केले. लग्न करताना त्याने पुण्यात घर नोकरी असल्याचे सांगितले. तसे काही नाही. तो कामही करत नाही. त्याच्यावर चोरी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अाहे. 
 
मुलाची फी भरण्यासाठी ठेवले होते पैसे 
सौ. महानंदा यांनी अाॅगस्ट रोजी बँकेतून पैसे काढून अाणले. मुलाची फी भरायची होती. ११ अाॅगस्टला कपाट उघडल्यानंतर त्यात पैसे आणि दागिने नसल्याचे दिसले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर चौकशी सुरू झाली अन् अमोलचे नाव समोर अाले. शनिवारी रात्री त्याला अटक झाली असून, रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर १९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली अाहे. 
 
आता चोरटा जावई खातोय कोठडीची हवा  
डिसेंबर महिन्यात त्या तरुणीने अमोलसोबत मंदिरात जाऊन विवाह केला. लग्नानंतर मात्र, अांतरजातीय विवाह असल्यामुळे घरी राहणे सध्या अशक्य अाहे. मुलगी तुमच्याकडे राहू दे म्हणून सांगितले. तोच घरी अधून-मधून येऊ लागला. अगदी जावयाप्रमाणे तो घरी वावरत होता. एवढी मुभा असतानाही त्याच्या डोक्यात वाईट विचार आला आणि त्याने चोरी केली. आता तो पोलिस कोठडीची हवा खात आहे. 
बातम्या आणखी आहेत...