आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजबजू लागला काॅलेज परिसर, दामिनी पथकाचा आहे दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उन्हाळीसुटी संपून शहरातील महाविद्यालयांचा परिसर आता गजबजू लागला आहे. काॅलेज प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे. दामिनी पथकाच्या दराऱ्यामुळे नव्याने महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुणींना दिलासा मिळाल्याने त्यांच्यातही आत्मविश्वास बळावला आहे. छेडछाड करणाऱ्या टवाळ मुलांच्या बंदोबस्तासाठी तैनात दामिनी पथक आता जीपीएस, व्हॉटस् अॅप आणि मोबाइल अॅपसारख्या अत्याधुनिक आयुधांनी सुसज्ज झाले आहे. पथक कार्यान्वित झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत अनेक तरुणींना वेळीच मदत मिळाल्यामुळे महाविद्यालयातील खुल्या वातावरणाचा आनंद तरुणींना घेता येत आहे.
संगमेश्वर, दयानंद, वालचंद ही मोठी महाविद्यालये अाहेत. ग्रामीण भागातील मुली येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. महाविद्यालयांच्या परिसरात दुचाकीवरून तरुणींची छेड काढणे, ये-जा करताना शेरेबाजी करणे आदी प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी दामिनी पथक, महिला गस्ती पथक, साध्या वेशातील महिला पथक, पोलिस निरीक्षक नियंत्रण गस्ती पथकांचा साखळी पद्धतीने बंदोबस्त ठेवला अाहे.

हुल्लडबाजीलाकायमचा लगाम : वालचंदमहाविद्यालयात काही तरुण हुल्लडबाजी करून गोंधळ घालत होते. शेरेबाजी करणे, भरधाव वेगात वाहने हाकणे असे प्रकार केल्यामुळे अनेकांना त्रास होत होता. दामिने पथकाला माहिती दिल्यानंतर काही मिनीटात पथक अाले. अधिकारीही अाले अन् हा प्रकार कायमचा बंद झाला. हा प्रसंग मागील शैक्षणिक वर्षातील अाहे.

अन्दामिनी पथकाच्या जाळ्यात पडले : जुळेसोलापुरातील एका शाळेसमोर काही तरुण मुलींची छेड काढत होते. त्या मुलींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर दामिनी पथकाची मदत घेण्यात अाली. पथकाने पाठलाग करून तरुणांना पकडले. असे अनेक अनुभव पथकाकडे अाहेत.

दामिनी पथकाचे काम चांगलेच
^शाळेतीलकाॅलेजातीलवातावरणे वेगळे असते. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र लेडीज काॅर्नर अाहे. महिला प्राध्यापक अन्य स्टाफ यांच्याकडून चौकशी, पाहणी असते. तक्रार पेटी ठेवली अाहे. अामच्या काॅलेजात काही अप्रिय घटना घडल्यास पोलिसांना फोन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मदतीला आल्याचा अनुभव आहे. दामिनी पथकांचे काम चांगले अाहे. त्यांच्याकडून मिळणारी मदत वाखाणण्याजोगी अाहे. विद्यार्थिनींशी संवाद साधून समस्याही जाणून घेतो. श्रीनिवास वडकबाळकर, प्राचार्य,दयानंद महाविद्यालय

शाळा, काॅलेज परिसरात पोलिस राहतील
^शाळा,काॅलेजसुटण्याच्या भरण्याचा वेळा, गर्दीच्या वेळा यांचा अभ्यास करून बंदोबस्त देऊ. दामिनी गस्ती पथकासोबत गुन्हे शाखेचे साध्या वेशातील महिला पोलिस नेमणार अाहे. प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेणार आहे. काॅलेजात तक्रार पेटी, सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलिस छात्र मित्र योजना राबवण्यासाठी संवाद राहील. गर्दीच्या वेळी नाकाबंदी राहील. इतरही उपाय करण्यात येतील. शर्मिष्ठा घारगे, सहायकपोलिस अायुक्त

मदतीसाठी इथे फोन करा
-शर्मिष्ठा घारगे, सहायक अायुक्त, संपर्क : ८८८८८००८०९
-शहर पोलिस नियंत्रण कक्ष : ०२१७-२७४४६००, ६२०
-टोली फ्री नंबर - १०९१
-व्हाटॅस्अॅप नंबर - ९४२२९५००३, ९४२३८८०००४

अाॅनलाइन तक्रार देऊ
पध्दत : मोबाउलमध्ये प्ले स्टोअर गुगलवर जाऊन सोलापूर सीटी अॅप हे अॅप डाऊनलोड करून घेतल्यानंतर यावरून मेसेज दिल्यानंतर अापला मोबाइल नंबर नियंत्रण कक्षात नोंद होतो. त्यानंतर अापण कुठलीही माहिती देऊ शकता.

दामिनी, गस्ती पथकांच्या वाहनांवर जीपीअारएस
^दामिनीगस्तीपथकाच्या वाहनांवर जीपीअारएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. वाहनाची माहिती नियंत्रण कक्षातून पाहायला मिळणार आहे. मदतीसाठी फोन अाल्यास पथक त्वरित घटनास्थळी जाईल. याशिवाय पोलिस अॅप, नियंत्रण कक्ष येथे थेट संपर्क करा. अॅप कसे डाऊनलोड करायचे, छेडछाड रोखण्यासाठी कसे प्रतिकार करायचे, तातडीने मदत कशी मागायची याबाबत शाळा, काॅलेजात जाऊन पोलिस जनजागृती करतील. पौर्णिमा चौगुले, पोलिसउपायुक्त, गुन्हे शाखा
बातम्या आणखी आहेत...