आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डेक्कन चार्टर’कडून विमानसेवेची वेळ बदलण्याच्या हालचाली सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डेक्कन चार्टरकडून सप्टेंबरमध्ये सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नुकतीच डेक्कनने याची वेळदेखील जाहीर केली. मात्र ती वेळ सायंकाळची असल्याने सोलापूरकरांना गैरसोयीचे ठरणार आहे. ‘दिव्य मराठी’ने या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. सोलापूर विमानतळाने सोलापूर -मुंबईची वेळ बदलण्यात यावी, अशी सूचना डेक्कन चार्टरला केली आहे. 
विमानतळ प्रशासनाच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत जुलै महिन्यात डेक्कन चार्टरचे पथक सोलापूर विमानतळाच्या पाहणीस येणार आहे. या वेळी वेळेबाबत चर्चा करून वेळेची निश्चिती केली जाईल, असे विमानतळ प्रशासनाला सांगण्यात आले. 

सोलापूर ते मुंबई विमानसेवेची वेळ सायंकाळची असल्याने सोलापूरकरांना ती गैरसोयीचे ठरणार आहे. वेळ चुकीची निवडल्याने याचा फटका प्रवासी संख्येवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यकाळात विमानसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वेळ सकाळची करणे गरजेचे आहे. 

सोलापूर विमानतळाबरोबरच चेंबर्स ऑफ कॉमर्सने वेळ बदलण्याचे डेक्क्न चार्टरला कळवले आहे. त्यानुसार आता वेळेच्या बाबतीत हालचाली सुरू झाल्या आहेत. सकाळी १० च्या आत सोलापूरहून -मुंबईसाठी विमान झेपावावे, अशी मागणी करण्यात आली आहे. असे झाले तर विमानसेवेला निश्चितच चांगला प्रतिसाद लाभणार आहे. 

वेळेबाबत सविस्तर चर्चा होईल 
^डेक्कन चार्टरने सोलापूरसाठी ठरवलेली वेळ गैरसोयीची आहे. या बाबत त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुढच्या महिन्यात त्यांचे पथक सोलापूर विमानतळाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. या वेळी सविस्तर चर्चा होईल.” संतोष कौलगी, विमानतळ व्यवस्थापक, सोलापूर 
 
 
बातम्या आणखी आहेत...