आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिना उलटला, रांगा, चलन तुटवडा, नव्या नोटा अन् कॅशलेस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोव्हेंबर...रात्रीचे आठ वाजलेले... पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकच वाहिन्यांवर आले... देशाला उद्देशून संदेश देऊ लागले... नेहमीच्या शैलीतीलच त्यांचे भाषण होते... पण, अचानकच त्यांनी तोफ डागली... पाचशे अाणि हजाराच्या नोटा रद्द केल्याची ती घोषणा होती... सामान्यांचा विश्वास बसलाच नाही... पुन्हा ऐकण्यासाठी टीव्हीकडे टक् लावले... लाल रंगात अक्षरेच उमटली... पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द... झाले.
त्या रात्री एकच धावपळ सुरू झाली. सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. या नोटांचे आता करायचे काय..? नोटेची पुरचुंडी झाली. त्यात शेंगदाणे आले. अनेकविध कल्पना आल्या. विनोद सुचले. अशा पद्धतीने रात्र
सरली... नोव्हेंबरला सर्व बँका बंद. एटीएमचे शटर्स अाेढले गेले. जुन्या नोटा खपवण्यासाठी पेट्रोलपंपांवर प्रचंड रांगा, महापालिका कर, महावितरणची देयके देण्यासाठी अक्षरश: झुंबड उडालेली. एका दिवसात महापालिकेच्या तिजोरीत एक कोटीच्या घरात कर जमा झाला. रात्री उशिरापर्यंत घेण्याचे काम सुरूच होते. सामान्यांपासून मध्यमवर्गीयांची अशी एकच धावपळ झाली. १० नोव्हेंबरला सकाळी दहालाच बँका उघडल्या गेल्या. तत्पूर्वीच लोकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या. आधार कार्ड घेऊन नोटा बदलून घेण्यासाठी लोक आले होते. बँकांनी त्यांच्या सोयीसाठी मांडव घातला. पाण्याची सोय केली. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग लावली. कक्ष वाढवून दिले. या पहिल्या दिवसापासून १५ दिवस रांगच रांग. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेकडून रोज नवे नियम यायचे. त्यानुसार बँकांमधली स्थिती बदलत गेली. चलन
संपुष्टात आले. स्टेट बँक सोडून इतर बँकांचे एटीएम बंदच राहिले.

बाजारपेठा थंडावल्या. दूध आणि भाजीविक्रेते अडचणीत आले. ग्रामीण भागात उधारीवर गावगाडा सुरू झाला. सोलापूरकरांनी बँकांमधून बदलून घेतल्या २९४८ कोटी रुपयांच्या नोटा
सोलापूरकरांनी २९४८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमधून बदलून घेतल्या. नवीन चलना थेट हजार रुपयांची नोट आली. त्याने सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला. पाचशेच्या नोटांचा अद्याप पत्ता नाही. चलन तुटवड्यावर कॅशलेस व्यवहारांचे उपाय पुढे आले. टपरीचालक,रिक्षाचालकांनी कधी ऐकलेही नसतील, अशा गोष्टी त्यांच्या हाती आल्या. त्यात ‘पेटीएम’ आले. मोठ्या दालनांमध्ये ‘पॉस’प्रणालीही आली. एक डिसेंबरला नोकरदारांचा पगार झाला आणि धूळ खात पडलेले धनादेश बँकेत आले.
बातम्या आणखी आहेत...