आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवानीराम सिकची गरजूंसाठी धर्मशाळा नव्हे, समस्या शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी आणि निराधारांना राहण्यासाठी अल्पदरात सोय व्हावी, या उद्देशाने भवानीराम सिकची यांनी आपली स्वत:ची शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या रेल्वे स्टेशनसमोरील जागा महापालिकेस दान दिली. त्यांनी ज्या उद्देशाने ती जागा दिली त्यास महापालिकेच्या वतीने हरताळ फासला जात आहे. तेथील दवाखाना बंद आहे तर राहण्यासाठी सुविधा नाही. तेथे फेरीवाले व्यापारी कोंडवाड्यासारखे राहतात, अशी स्थिती आहे. ती धर्मशाळा नव्हे बंदिशाळा असल्याची स्थिती आहे. त्या धर्मशाळेची पाहणी नगरसेवक संतोष भोसले यांनी शुक्रवारी केली. 
 
रेल्वे स्टेशनसमोर भवानीराम सिकची दवाखाना असून, तेथे मागील दहा वर्षांपासून सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे तो बंद पडला आहे. दवाखान्याची अवस्था कचराकुंडीसारखी झाली असून, तिथे लाकडे, फाटलेले मळकट कपडे टाकून दिले आहेत. ती जागा देताना नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, हे सिकचीचा मुख्य उद्देश होता. मात्र हा उद्देश येथे कोणत्याही परिस्थितीत दिसून येत नाही. 

कचराकुंडीपेक्षा भयावह अशी खोल्यांची स्थिती 
तेथे सुमारे २२ खोल्या असून, एकही खोली सुस्थितीत नाही. खोल्यांचे दरवाजे तुटलेले आहेत. खिडक्यांना दरवाजा आणि काचा नाहीत, त्या खोल्यांत स्वयंपाक केल्याने भिंती काळपट झालेल्या आहेत. पुरेशी लाइट नसल्याने अंधार आहे. खोलीत स्वयंपाक करण्यास बंदी असताना खुलेआमपणे स्वयंपाक केला जातो. तेथे प्रवासी राहत नाहीत, शहरात फिरून व्यापार करणारे परप्रांतातील नागरिक मोठ्या प्रमाणात असुरक्षितपणे राहतात. फाटलेली आणि मळकट अंथरुणे आहेत. तेथे शौचालयाची दुरवस्था असून, त्यांना दरवाजे नाहीत, अस्वच्छता असल्याने सर्वत्र दुर्गंधी आहे. मैदानात चुली मांडून स्वयंपाक केला जातो. तेथे असलेली स्वयंपाक खोली बंद आहे. 
गाळ्यांनाभाडे कमी, रात्री टपरीधारकांना जागा 

महापालिकेच्याताब्यातील त्या इमारतीत स्टेशनच्या समोर असलेल्या गाळ्यांना भाडे कमी आहे. त्यांना भाडेवाढ केली नाही. ३०० ते १००० रुपयांपर्यंत अल्पसे भाडे आहे. तेथील गाळेधारक रात्री तेथील टपरीधारकांना जागा देतात. त्यांच्याकडून त्यापोटी भाड्यापेक्षा जास्त रक्कम घेतात. काही गाळेधारक न्यायालयातही गेले आहेत. 

रेल्वे स्टेशन समोरील सिकची धर्मशाळेची अतिशय अस्वच्छ परिसर असलेली इमारत. 
खासगी लाॅज सुस्थितीत भवानीराम सिकची धर्मशाळेत खासगी लाॅज असून, तेथे सर्व सोयी आहेत. त्यांचे उत्पन्न चांगले आहे. पण महापालिकेच्या जागेची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे कोणी राहण्यास येत नाही. 

कर्मचारी आहेत, काम नाही 
तेथे महापालिकेच्या वतीने सुमारे १२ कर्मचारी आहेत, त्यापैकी दोन कर्मचारी कायम गैरहजर आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन असल्याने ते काम करत नाहीत. त्यामुळे तेथे स्वच्छता नाही. 

महापालिकेने विश्रामगृह केल्यास जास्त उत्पन्न 
महापालिकेनेतेथे १५ ते २० लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने विश्रामगृह करून भाड्याने चालवल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि नागरिकांची सोय होईल. 

पाहणी केली 
^माझ्या प्रभागात धर्मशाळा येत असल्याने शुक्रवारी पाहणी केली. तेथे गैरकारभार चालत असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. त्याचे उत्पन्नही कमी आहे. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी आणि महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांना सांगून धर्मशाळा दाखवणार आहे. स्मार्ट सिटीत ही धर्मशाळा चांगलीे झाल्यास मनपाचे उत्पन्न वाढेल. संतोष भोसले, नगरसेवक 
 
बातम्या आणखी आहेत...