आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार दिलीप मानेंवर आरोप करणाऱ्या पिडीत महिलेचा आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी आमदार दिलीप माने व त्यांच्या साथीदारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणाऱ्या पिडीत महिलेने सोमवारी जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर आपला आक्रोश व्यक्त केला.  


यापूर्वीच या महिलेनी आपले लैंगिक शोषण झाले असून त्याचा जाब संबंधिताना विचारुन अटक करावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी फिर्याद दिली आहे. त्याचा तपास संथगतीने होत आहे, काही पोलिस कर्मचारी सारखे यासंदर्भात विचारणा करीत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी या पीडितेने मोठे डिजीटल फलक या संरक्षक भिंतीवर लावून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून दबाव येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी आपल्या चेहऱ्यास पूर्ण झाकले होते, तसेच त्यांनी वेळोवेळी या पोलिस स्टेशनमधून एक महिला व पुरुष कर्मचारी येऊन मला या प्रकरणाची विचारणा करतात. परंतू त्यांचा विचारण्याचा सूर केवळ विचारणे नसून धमकी वजा सूचना असते, असे त्या म्हणाल्या. येथे त्यांनी आपला आक्रोश सुरु केल्यावर काही पोलिस कर्मचारी पुनम गेटसमोर येत त्यांना घेऊन गेले, परंतू त्यांना नक्की पोलिस मुख्यालय की पोलिस अधिक्षक कार्यालय येथे नेण्यात आले? याची माहिती मिळू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...