आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्षासाठी देशपांडे, प्रभावळकर यांची नावे चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते दिलीप प्रभावळकर. - Divya Marathi
अभिनेते दिलीप प्रभावळकर.
सोलापूर- येथे होणाऱ्या पहिल्या बाल नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि सुलभा देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. १८ ऑगस्ट रोजी फडकुले सभागृहात संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन होणार असून यावेळी संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य मध्यवर्ती परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२.३० वाजता कार्यालयाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमात संमेलनाच्या अध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळात पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.