आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदा गावांतील मुलींच्या नावे पाच हजारांची ठेव, जिल्हा परिषद सदस्याचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला  - सोलापूर जिल्ह्यातील एखतपूर जि.प.गटातील गावांमध्ये १ जानेवारी ते डिसेंबर २०१७  कालावधीत जन्मलेल्या मुलींसाठी येथील नवनिर्वाचित सदस्याने ५ हजार रुपयांच्या ठेवीची योजना आणली आहे. शिवाय, ते या गटातील अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकलचेही वाटप करणार आहेत. या त्यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

मेथवडे(ता.सांगोला) येथील युवा उद्योजक अतुल पवार हे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी झाले आहे. केंद्र सरकारकडून देशभरात राबविल्या जात असलेल्या बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानाने पवार चांगलेच प्रेरित झालेले आहेत. त्यामुळेच त्यांनी  त्यांची मुलगी आराध्याच्या नावे “आराध्या’ योजना आणली आहे.  या योजनेनुसार, त्यांच्या एखतपूर जिल्हा परिषद गटातील १४ गावांतील कुटुंबांत १ जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत जन्मलेल्या कन्येच्या नावे ५ हजार रुपयांची ठेव जमा केली जाईल. ही मुदतठेव मुलीच्या वयाच्या १८ वर्षानंतर लग्न ठरल्यानंतर व्याजासह काढता येईल. त्यामुळे गोरगरिबांना बरीच मदत होणार आहे. 
 
३५ कुटुंबांना दिली मदत 
अतुल पवार यांनी शिरभावी येथील अमोल पवार व वाकी शिवणे येथील संजय माने यांच्यासह ३५ कुटुंबांना आजपर्यंत  प्रत्येकी पाच हजार रु. प्रमाणे कायम ठेव पावती पती-पत्नीच्या नावे करून दिली आहे. यासाठी कन्या जन्माचा दाखला घेऊन त्यांच्या कार्यालयात नोंदणी करावी लागते.
 
बातम्या आणखी आहेत...