आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद ZP मध्ये खासदारपुत्राचा पराभव, आमदारपुत्राचा विजय; नेते हरले, जिंकले वारसदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरग्यात भाजपचे अॅड. अभयराजे चालुक्य यांच्या मिरवणुकीत जेसीबीने गुलाल उधळला. - Divya Marathi
उमरग्यात भाजपचे अॅड. अभयराजे चालुक्य यांच्या मिरवणुकीत जेसीबीने गुलाल उधळला.
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेत यावेळी प्रथमच नवखे आणि तरुण चेहरे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यात खासदार-आमदारांच्या मुलांचाही समावेश होता. प्रथमच रिंगणात उतरलेल्या खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या मुलाचा दारूण पराभव झाला तर आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील, आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र बाबुराव चव्हाण निवडून आले. दुसरीकडे नेत्यांची घराणेशाही काही प्रमाणात मतदारांनी स्वीकारल्याचे चित्र दिसून आले. 
 
नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात उतरणार असल्याचे वृत्त जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच दुसऱ्या दिवशी ‘दिव्य मराठी’ने प्रसिध्द केले होते. त्यात नेत्यांच्या मुलांची नावेही दिली होती. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले. त्यानुसार नेत्यांची पिढी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. त्यात शिवसेनेचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड, आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील, आमदार मधुकर चव्हाण यांचे दुसरे पुत्र बाबूराव चव्हाण, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे पुत्र आदित्य गोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या स्नुषा अश्विनी जवळगे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे पुत्र दिग्वीजय शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी चालुक्य यांचे चिरंजीव तथा राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे मेहुणे अभयराजे चालुक्य आदींचा समावेश होता. या निवडणुकीत खासदारपुत्र किरण गायकवाड यांना कुन्हाळी गटातून (ता.उमरगा)काँग्रेसच्या प्रकाश आष्टेंनी काट्याची टक्कर दिली. त्यात किरण गायकवाड पराभूत झाले. आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील यांनी आलूर गटातून बाजी मारली. गुंजोटी (ता.उमरगा)गटातून भाजपचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे पुत्र दिग्विजय शिंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे दत्तू कटकधोंड यांना पराभूत केले. राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे पुत्र आदित्य गोरे यांचा शिवसेनेचे कैलास पाटील यांनी सांजामधून (ता.उस्मानाबाद) पराभव केला. गोरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. आमदार राणाजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील तेरमध्ये विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे सतीश सोमाणी यांचा पराभव केला. एकंदर अपवाद वगळता नेत्यांचे नातेवाइक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडून आले असून, आता जिल्हा परिषदेत तरुण चेहरे सर्वाधिक दिसतील. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा भाजपला फायदा : जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी काँग्रेसकडून मोहा (ता. ता.कळंब) गटातून निवडणूक लढविली. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या संदीप मडके यांनी पराभूत केले. झेडपी उपाध्यक्ष राहिलेल्या केशव उर्फ बाबा पाटील सेनेत प्रवेश करून लढले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सभेने तुरोरी गटातील वातावरण भाजपकडे फिरले आणि बाबा पाटील यांचा भाजपच्या अभयराजे चालुक्य यांच्याकडून पराभव झाला. जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असलेले बिभीषण खामकर यांचा गट आरक्षित झाल्याने तेरखेड्याऐवजी येरमाळ्यातून नशिब अजमावले. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या उमदेवाराने पराभूत केले. शिराढोणमधून राष्ट्रवादीच्या सदस्या कांचनमाला संगवे पराभूत झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक प्रश्नावर पाच वर्षे रान उठविले होते. नेत्यांचे वारसदार असलेल्या चेहऱ्यांना मात्र जिल्हा परिषदेत संधी मिळाली. 
 
मुख्यमंत्र्यांच्यासभेचा भाजपला फायदा : जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी काँग्रेसकडून मोहा (ता. ता.कळंब) गटातून निवडणूक लढविली. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या संदीप मडके यांनी पराभूत केले. झेडपी उपाध्यक्ष राहिलेल्या केशव उर्फ बाबा पाटील सेनेत प्रवेश करून लढले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सभेने तुरोरी गटातील वातावरण भाजपकडे फिरले आणि बाबा पाटील यांचा भाजपच्या अभयराजे चालुक्य यांच्याकडून पराभव झाला. जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असलेले बिभीषण खामकर यांचा गट आरक्षित झाल्याने तेरखेड्याऐवजी येरमाळ्यातून नशिब अजमावले. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या उमदेवाराने पराभूत केले. शिराढोणमधून राष्ट्रवादीच्या सदस्या कांचनमाला संगवे पराभूत झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक प्रश्नावर पाच वर्षे रान उठविले होते. नेत्यांचे वारसदार असलेल्या चेहऱ्यांना मात्र जिल्हा परिषदेत संधी मिळाली. 

खामकर, दुधगावकर, संगवेंचा पराभव 
जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आणि पक्षाचे बलाढ्य नेते असलेल्या लढती लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यात बहुतांश ठिकाणी विद्यमान सदस्यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात होते. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. धीरज पाटील सिंदफळ गटातून दीड हजाराच्या फरकाने निवडून आले. माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्यासह माजी सदस्य बिभीषण खामकर, कांचनमाला संगवे आदींचा पराभव झाला. 
 
संयमी नेतृत्वाचा विजय 
झेडपी अध्यक्ष असताना अॅड. धीरज पाटील यांनी अनेक कामे केली. शांत, संयमी स्वभावाच्या अॅड. पाटील यांनी अडीच वर्षे पारदर्शक कारभार केला. त्यांना सिंदफळ गटातून राष्ट्रवादीचे संदीप गंगणे यांनी आव्हान दिले होते. मात्र, ते जवळपास दीड हजार मतांच्या फरकाने निवडून आले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादी फेल... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...