आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समितीवर राहणार भाजप-सेनेचा झेंडा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा नियोजन समितीचे ४० नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिकांचे ४३१ सदस्य हे ४० सदस्य निवडणार आहेत. शहर, जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्रे आता भाजप-सेनेच्या ताब्यात गेल्याने जिल्हा नियोजन समितीवर त्यांचेच सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्हा परिषद २७, महापालिका तर नगरपालिकांचे अशी सदस्य संख्या निवडली जाणार आहे.
 
महापालिकेत भाजपचे ५१ तर सेनेचे २२ असे ७३ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेवर भाजप पुरस्कृत तिसऱ्या आघाडीचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य वगळता इतर सर्व सदस्य भाजप उमेदवारास मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका जिल्हा परिषद या दोन संस्थेतूनच ३६ सदस्यांची निवड होणार आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप-सेना सदस्यांची मतदार संख्या पाहता भाजप-सेना सदस्यांचा अधिक भरणा राहणार आहे. 

पायंडा मोडण्याचे धाडस दाखवणार? 
मागील अनेक वर्षे जिल्हा नियोजन समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचेच अधिक सदस्य होते. पहिल्यांदाच भाजप-सेनेला नियोजन समिती ताब्यात घेण्याची संधी आहे. महापालिका जिल्हा परिषदेतील सदस्यांना समितीचे सदस्य असूनही बोलण्याची संधीच मिळत नव्हती. आता समिती सदस्य भाजप-सेना पक्षाचे तर अधिक आमदार हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे असल्याने बैठकीत जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिव आहेत. स्थानिक संस्थेच्या विकासासाठी महापालिका, जिल्हा परिषद नगरपालिका येथील निवडून आलेल्या सदस्यांनी प्रश्न मांडण्यासाठी संधी दिली जाते. मात्र आमदारच आमदारच बैठक चालवतात, असा आरोप सदस्यांकडून होत असे. आता नवीन निवड होणारी समिती हा पायंडा मोडणार का? हे प्रत्यक्ष बैठकीवेळी पाहण्यास मिळणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...