आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर जयंती उत्सव खर्चास फाटा देत साकारला वृद्धाश्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वृद्ध, निराधार गरजू ज्येष्ठ नागरिकांना मायेची ऊब सावली देण्यास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करता वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. हा वृद्धाश्रम येळेेगाव रस्ता मंद्रूप येथे थाटण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ९९ फ्रेंड्स बहुउद्देशीय संस्थेतर्फे पार्वती वृद्धाश्रमाचे सोमवारी आैपचारिक उदघाटन केले. प्रत्यक्षात मेपासून वद्धाश्रम सुरू होईल.
डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी विविध कार्यकर्ते मंडळे जय्यत तयारी करतात. परंतु फ्रेंड्स ग्रुपने याला फाटा देत वृद्धांची सेवा ही खरी सेवा या उक्तीने कामाला सुरुवात केली. मंद्रूप येथे भाडेतत्त्वावर जागा घेतली. त्या ठिकाणी १० स्त्री १० पुरुष यांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे. या वृद्धाश्रमाचे उद््घाटन माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. अनिल आबुटे, प्रा. दत्तात्रय पवार, दिनेश जाधव, जमीर शेख, मनोज भालेराव, राहुल जगझाप, प्रतीक वाघमारे, श्रावण डोंगरे, अजय भालेराव इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जयंती साजरी करण्यासाठी २० हजार रुपये खर्च येतो. पंरतु २५ बेडचे वृध्दाश्रम उभा करण्यासाठी साडे सात लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार विविध मान्यवर लोकांकडून देणगी स्वरुपात मागणी करुन निधी उभा करणार आहोत, राजकीय लोकांची देखील मदत घेणार आहोत.

निराधारांना मिळेल आधार
वृद्धाश्रम निर्माण करण्याच्या अगोदर शहरातील पुण्यातील काही वृद्धाश्रमाची स्थिती याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतरच सोलापुरात निराधार वृद्ध आहेत, तर काही पैसे असूनही प्रेमापासून पोरके आहेत. अशांना येथे निवारा मिळेल.

येत्या मेपासून प्रत्यक्षात सेवा सुरू होणार
समाजकार्याचीपदवीघेतली आहे. त्यामुळे समाजसेवा ही ईश्वर सेवा यानुसार संस्थेची स्थापना केली आहे. या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वृद्ध व्यक्तींना मूलभूत गरजा सामाजिक प्रतिष्ठा मिळून देणे मुख्य काम आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वयोवृद्ध आई, वडिलांपासून मुले दूर जात आहेत. पैसा असून त्यांना माया प्रेम मिळत नाही. त्यामुळे निर्माण होणारी पोकळी पार्वती वृद्धाश्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वृद्धाश्रम मे पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे.” संतोष ऐदाळे, संस्थापक
बातम्या आणखी आहेत...