आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: जय भीम, जय भीम जन्मला माझा भीम!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे स्वागत करण्यासाठी रात्री १२ वाजता डॉ.आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी आलेले भीमसैनिक. - Divya Marathi
डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे स्वागत करण्यासाठी रात्री १२ वाजता डॉ.आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी आलेले भीमसैनिक.
सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री शहरात एकच जल्लोष झाला. शोभेच्या दारूकामाची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. हलग्यांच्या निनादात जय भीमच्या घोषणा देत फेऱ्या काढण्यात आल्या. ‘जय भीम, जय भीम, जन्मला माझा भीम...’ म्हणत तरुणाई रस्त्यावर आली. 
 
रात्रीचे बारा वाजले आणि शोभेच्या दारूकामाने रस्ते उजळून निघाले. जमिनीवरून उंच उडत आकाशात रंगांची उधळण करणारी ही आतषबाजी होती. आवाज बिलकुल नाही. निळ्या रंगात न्हाऊन निघालेली तरुणाई दुचाकींवर स्वार झाली. आंबेडकर पुतळ्याकडे सुसाट निघाली. सोबत ‘जय भीम’च्या प्रचंड घोषणा होत्या. काही युवतीही त्यात सहभागी झाल्या होत्या. आंबेडकर चौकात अभिवादन करण्यासाठी भीमाच्या लेकरांची एकच गर्दी झाली होती. 
 
पोलिसांचा फौजफाटा : जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजी चौक, नवीवेस पोलिस चौकी आणि आंबेडकर चौकात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा होता. रस्त्यावर बॅरिकेड्स घालून पोलिस सज्ज होते. अधिकारी ठाण मांडून बसले होते. नवीवेस पोलिस चौकीच्या बाहेर उपायुक्त पौर्णिमा चौगुले या उपस्थित होत्या. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...