आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरुवातीच्या पावसातच महापालिकेच्या गटारव्यवस्थापनाचे ढोंग उघडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात पाऊस झाल्यानंतर त्याचे पाणी नाल्यात जावे, नाल्यांचे पाणी लाेकांच्या घरात जाऊ नये, म्हणूनच नाल्यांची स्वच्छता व्हावी यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व कामांसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र, यंदा शहरात पावसाळ्यापूर्वीची कामेच झाली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या अाहेत. रविवारी, सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून लाेकांच्या घरातही पाणी गेले हाेते. याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक परिसरांतील नाल्यांची स्वच्छताच झालेली नाही. दरवर्षी महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या माेहिमेत रस्त्याच्या कडेला असलेले तसेच मोकळ्या भूखंडावरील प्लास्टिक कचरा जमा करणे, नाल्यांमधील प्लास्टिक, नाल्यांमधील कचरा स्वच्छ करणे, परिसरातील ड्रेनेजचे चाेकअप काढणे, मातीचे ढीग उचलणे आदी कामे या मोहिमेत केली जातात. मात्र, यावर्षी ही कामेच केलेली नसल्याने रविवारी ठिकठिकाणी त्याचा परिणाम दिसून आला. हद्दवाढ भागातील अनेक घरात पाणी घुसल्याने घरातील साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तरीही महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. 
 
पाण्यास चर मारून दिली 
^पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक घरात पाणी गेले. नाले भरून वाहत असल्याने घरातील पाणी कमी होत नव्हते. कालपासून पाण्याचा निचरा झाल्याने पाणी कमी झाले. अनेक घरे खाली आहेत तर रस्ता उंच आहे. त्यामुळे पाणी घरात गेले. महापालिकेने चर मारून दिलीे. काम केले त्यामुळे पाणी कमी झाले आहे. मोदी रेल्वे भुयारी मार्ग येथे ड्रेनेजचे काम केल्याने पाणी जात नाही. त्याचे काम सुरू आहे.” लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगर अभियंता, महापालिका 

पूर्वीचे नियोजन नाही 
^महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ड्रेनेजलाइन घालताना पाण्याची पातळी पाहिली नाही. पाण्याची पातळी कमी असल्याने अनेक घरात पाणी थांबते. त्यांचा त्रास नागरिकांना होतो. संभाजी तलाव, मराठा गल्ली आदी भागात पाणी साचते. मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने पाणी साचले. महापालिकेच्या मदतीने पाणी काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले. यापुढील काळात महापालिकेने योग्य खबरदारी घ्यावी.” संतोष भोसले, नगरसेवक 

मोहीम केवळ फोटोसेशनसाठीच 
महापालिका प्रशासनाकडून ज्या प्रभागात माेहीम सुरू करावयाची असते, त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते ड्रेनेजलाइन कामांच्या माेहिमेचा प्रारंभ करण्यात येताे. मात्र, फोटोसेशन होऊन प्रारंभ हाेताच अगाेदर नगरसेवक नंतर अधिकारी असे एक-एक करत माेहिमेतून काढता पाय घेतात. त्यानंतर इतर विभागांतील कर्मचारी निघतात. ज्या उद्देशाने माेहीम सुरू करण्यात येते, ताे उद्देश साध्य हाेणे दूरच. याउलट जोरदार पाऊस आल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी देऊनसुद्धा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

नैसर्गिक नाल्यांकडेही दुर्लक्ष 
पावसाळा पूर्व कामात नाल्यांची स्वच्छता गरजेची असताना याकडे पाठ फिरवली गेली. रविवारी आलेल्या पावसात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले तर या नाल्यांजवळील असलेले ड्रेनेजदेखील तुंबल्यामुळे या परिसरातील इमारतींमध्ये या पाणी घुसले. यामुळे सकाळपासूनच या परिसरातील नागरिक आपल्याच घरात पाणी काढण्याच्या कामाला लागले होते. अशी स्थिती असतानाही या परिसरात ना लाेकप्रतिनिधी फिरकले ना पालिकेचे अधिकारी. 

या भागात व्हावी ड्रेनेज, नालेसफाई 
होटगी रोड नवोदय पार्क, दमाणीनगर, लष्कर, मोदी रेल्वे पुल, सोनामाता शाळा परिसर, कुंभारवेस शाॅपिंग सेंटर, विडी घरकुल परिसर, विजापूर रोड अत्तार नगर, सम्राट चौक, हरिभाई देवकरण प्रशाला रोड, अासरा चौक ते अौद्योगिक पोलिस चौकी रस्ता, अशोक पोलिस चौकी चौक परिसर, चौपाड परिसर, रंगभवन चौक, ग्रामीण पोलिस मुख्यालय ते जोडबसवण्णा चौक, सात रस्ता ते रंगभवन रस्ता, कुमार चौक शिवाय शहरातील अनेक नगरातील अंतर्गत रस्त्यावरील ड्रेनेज तुडुंब भरून वाहत असतात. या ठिकाणची नालेसफाई ड्रेनेजलाइन सातत्याने साफ केली पाहिजे. 
 
अधिकाऱ्यांकडून मिळणारी उत्तरे 
पावसाळा पूर्व कामांसाठी दरवर्षी विशेष स्वच्छता मोहिमेचे महापालिकेचे ढाेंग यावर्षीही नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरले अाहे. शहरात गेल्या सोमवारी अाणि या अाठवड्यात पुन्हा रविवारी अाणि सोमवारी मोठा पाऊस झाला अन् माेठ्या प्रमाणावर ड्रेनेज, पावसाळी नाले, गटारी तुंबल्याने पालिकेच्या स्वच्छता माेहिमेचा फज्जा उडाला. सातत्याने पडणाऱ्या रिमझिम पावसानेही हद्दवाढ, होटगी रोड, पूर्व भाग, दमाणीनगर अादी परिसरातील बैठी घरे असलेल्या अनेक भागांत पाणी साचून नागरिकांच्या घरांत तळे साचले हाेते तर त्याबराेबरच अनेक ठिकाणी गटारीचे पाणीही वर येत या पाण्यात मिसळत असल्याने नागरिक हैराण झाले हाेते. सुरुवातीच्या पावसातच अशी परिस्थिती हाेत असेल तर अजून तीन महिने होणाऱ्या पावसात नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागेल, अशा प्रतिक्रिया देत या भागातील नागरिकांनी पालिकेकडून तत्काळ उपाययाेजनेची अपेक्षा केली अाहे. 
 
मनमानी कारभार 
पावसाळी गटारीची देखभाल नाही : शहरातीलहोटगी रोड, रंगभवन ते डफरीन चौक, सम्राट चौक ते पांजरापोळ, सम्राट चौक ते तुळजापूरवेस, मौलाली चौक ते जोडबसवण्णा चौक, पोलीस हेडक्वाॅर्टर ते पोटफाडी चौक, दयानंद महाविद्यालय ते जुना बोरामणी नाका, जुना एम्प्लायमेंट या रस्त्याच्या कडेला फुटपाथच्या खाली असलेल्या पावसाळी गटारींची देखभाल होत नाही. ते वेळेवर साफ केले जात नाही. 
 
{ पूर्व विभागात पावसाळ्यापूर्वीची कामे झाली का? 
-संपूर्ण विभागात कामे सुरू होती. ती पूर्ण झाली की नाही, याची माहिती घ्यावी लागेल. 
{रविवारी झालेल्या पावसात नाल्यांचे पाणी रस्त्यावर वाहत होते, काय कारण? 
- नगरअभियंताआणि पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळापूर्वीची कामे केली जात आहेत. नाले, ड्रेनेजसंदर्भातही काम सुरू आहे. 
{गावठाणासह अनेक भागांत ड्रेनेज आणि नाल्याचे पाणी घरात घुसले, त्याचे काय? 
- संबंिधतअधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून या भागातील ड्रेनेज दुरुस्तीसंदर्भात सूचना केल्या जातील. 
 
आपल्या प्रतिक्रिया : तुमचीपसंती नावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा. 
बातम्या आणखी आहेत...