आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजमध्ये कर्मचारी सुरक्षा साहित्याविना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पावसाळ्यामुळे शहरातील विविध भागातील ड्रेनेललाइन तुंबत अाहेत. सांडपाण्याच्या गटारींमध्ये प्लास्टिकसह कचरा साचल्याने मनपा प्रशासनाने सफाई कामाचा सपाटा लावला अाहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ते साहित्य खरेदी केले. परंतु कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. आॅक्सिजन पुरवठा संचासह इतर सुरक्षा साहित्य गोदामातच पडून अाहे. रबरी मोजे संपले तर पादत्राणे कुठे ठेवलेत तेच सापडत नाही. प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवित सुरक्षिततेबद्दल गंभीर नसल्याचे दिसते अाहे. 
 
ड्रेनेजलाइनमध्ये काम करताना विषारी वायूमुळे काही कर्मचारी मरण पावल्याच्या घटना धर्मवीर संभाजी तलाव, सम्राट चौक, आडवा नळ येथे घडल्या अाहेत. कर्मचाऱ्यांना काम करताना अावश्यक ती सुरक्षा साधने पुरवल्याने हे प्रकार मागील दोन-तीन वर्षांत घडले. त्यानंतर महापालिकेने तातडीने गम बूट, मोजे, आॅक्सिजन संच आदी साहित्य खरेदी केले. पण ते साहित्य आज वापरात नाही. कर्मचारी तसेच काम करताना दिसतात. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळील सांडपाणी नाला सफाई करताना मजुराकडे कसलेच सुरक्षा साहित्य नव्हते. चौपाड परिसरात विना साहित्य कर्मचारी लाइनमध्ये उतरले होते. जीव मुठीत धरून मनपा कर्मचारी काम करतात. दुसरीकडे साहित्य गोदामातच पडलेले दिसते. वरिष्ठ अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. 

साहित्य वापरात नसेल तर पाहू 
^ड्रेनेजलाइनमध्ये कामकरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी साहित्य असून, वापरण्यास दिले जात नसेल तर ते पाहू. सुरक्षा साहित्य पुरवणे प्रशासनाची नैतिक जबाबदारीच अाहे.” डाॅ.अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त 

 
बातम्या आणखी आहेत...