आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: नील्स बोर व वर्नर संवादाधारित नाटक शनिवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोपेनहेगन या कोल्हापूर निर्मित प्रबोधनात्मक नाटकाचा प्रयोग शनिवारी (दि.१६) सायं. वा. हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे. या नाटकाचा विज्ञान, इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापक विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन रवींद्र मोकाशी यांनी केले आहे. 
 
कोपेनहेगन हे दोन अंकी नाटक नील्स बोर आणि वर्नर हायझेनबर्ग या दोन महान शास्त्रज्ञांच्या १९४१ च्या गोपनीय भेटीवर आधारलेले आहे. याची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुध्दाची आहे. हिटलरच्या फौजांनी बराचसा युरोप पादाक्रांत केला आहे. अणुविज्ञानाचा उपयोग करून निर्णायक विजयासाठी शस्त्रास्त्र बनवता येईल काय अशी उत्सुकता सगळीकडे होती. एका बाजूला दोस्त राष्ट्राचा अण्वस्त्र कार्यक्रम अतिशय गुप्तपणे मॅनहटन प्रोजेक्ट या नावाखाली अमेरिकेत राबवला जातोय. दुसरीकडे जर्मनीचा अणु कार्यक्रम वर्न हायझेनबर्ग या बुद्धिमान जर्मन शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अशा वातावरणात हायझेनबर्ग जर्मनव्याप्त डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे गुुरू क्वॉंटम मेकॅनिक्सचा जनक नील्स बोर या भेटण्यासाठी जातो. या भेटीमध्ये काय घडले. कोणती चर्चा झाली. तिचे तत्कालीन अण्वस्त्र स्पर्धेवर काही परिणाम झाले किंवा काय हे इतिहासाला माहीत नाही. हे गूढच या नाटकाचा विषय आहे. 
 
मायकल फ्रायन यांनी लिहिलेल्या या नाटकाचे भाषांतर प्रा. डाॅ. शरद नावरे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. शरद भुताडीया यांनी केले. सागर तळाशीकर, मेघना खरे डॉ. भुताडीया यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अधिक माहिती प्रवेशिकेसाठी परिवर्तन अकादमी, सोनामाता शाळासमोर, मोदी परिसर येथे संपर्क करावा. संपर्कासाठी ९४२२६४५०५५ शी संपर्क करावा. 
 
बातम्या आणखी आहेत...