आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुकल्या बहिणी देताहेत ‘इको फ्रेंडली बाप्पा’चे प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गणपती बाप्पांचे आगमन व्हायला अनेक महिने अवधी आहे. पण दोन चिमुकल्या बहिणी आतापासूनच कामाला लागल्या आहेत. शाळा-शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना शाडू किंवा मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण त्या देत आहेत. त्या दोघींनी आजवर शहरातील किमान ५०० बालसवंगड्यांना प्रशिक्षण दिले आहे. नववीत शिकणारी मनाली अन् पाचवीतली अनिशा या त्या बहिणी. 
 
प्लास्टर ऑफ पॅरिस आणि अन्य रसायनांचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. याबद्दल अलीकडच्या काळात जागरूकता वाढली आहे. शहरात इको फ्रेंडली गणपती बनवणारे निसर्गप्रेमींचे अनेक गटही तयार झाले आहेत. पण बालवयातच जागरूकता असणे आणि त्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हे तसे दुर्मिळच. सोलापुरातील कल्याणनगर भागात राहणाऱ्या मनाली अनिशा जाधव या दोघी विविध शाळांत जाऊन मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देतात. जुळे सोलापूर परिसरातील वि. मो. मेहता शाळेत त्या शिकत आहेत. वडील नितीन जाधव हे शिल्पकार मूर्तिकार आहेत. मूर्ती बनवणे, वेगवेगळे पुतळे, मॉडर्न आर्ट आदी कामे त्यांच्या स्टुडीओमध्ये चालतात. तीन वर्षांपासून मनाली या कामात आली. तिने मूर्ती बनवायचे धडे वडिलांकडून घेतले. नंतर सराव करत तिने याला छोट्या चळवळीचे रूप दिले आहे. नंतर मदतीला लहान बहीण अनिशा आई अभिंजली आल्या. 
 
दोन्ही बहिणींनी मिळून मागील तीन वर्षांत २० हून अधिक शाळांतील विद्यार्थी आणि १५ सार्वजनिक मंडळांतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे. नुकतेच नूमवि प्रशालेत त्यांनी उन्हाळी अभ्यास वर्ग घेतला. सध्या जुळे सोलापुरातील नूमवि प्रशालेत हे उन्हाळी शिबिर सुरू आहे. 
जुळे सोलापूर येथील नूमविमध्ये इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा सुरू असताना. 
बातम्या आणखी आहेत...