आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षणातील धोरणात्मक निर्णयासाठी विद्यार्थी सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उच्चशिक्षणातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या उपस्थिती, प्राध्यापक संख्या तसेच इतर पूरक माहिती संकलन उपयुक्त ठरेल, त्या अनुषंगाने विविध प्रपत्रांमध्ये सुमारे ४० अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती, उच्च शिक्षण सहसंचालक एस.एम. देशपांडे यांनी दिली.

१४ ते १७ ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात विविध महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थी सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी सहयोगी प्राध्यापक तसेच शिक्षण संचालक कार्यालयातील सक्षम अधिकारी यांच्या सात टीम सोलापूर जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आल्या होत्या. एका टीमध्ये तीन सदस्य होते. महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी पटपडताळणी होत असल्याने या सर्वेक्षणाबाबतची गंभीरता प्रत्येक महाविद्यालयाने काळजीपूर्वक घेतली. या मोहिमेच्या तारखांबाबत पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. ऑक्टोबर महिन्यात असे सर्वेक्षण होणार असल्याबाबतची पूर्व कल्पना एका परिपत्रकाद्वारे प्रत्येक महाविद्यालयांना देण्यात आली होती.

सर्वेक्षणात जिल्ह्यातील महाविद्यालयांतून सरासरी ७५ ते ८० टक्के उपस्थिती अाढळून आली, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली. कॉलेज बंक करण्याची विद्यार्थ्यंांची सवय लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्याचे कठीण काम माध्यमिक विद्यार्थ्यांपेक्षा कठीण असते. मात्र,या परीक्षेत महाविद्यालयच उत्तीर्ण झाली.

अहवालाचे काम सुरू
सर्वेक्षणाचेप्रत्यक्ष काम संपले असले तरी याचा अहवाल तयार करण्यात येतो आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाकडे सुपूर्द होईल. तेथून हा अहवाल उच्च शिक्षण विभागाकडे दिला जाईल. या सर्वेक्षणातील माहितीचा उच्च शिक्षणासंदर्भातील धोरणात्मक िनर्णय घेण्यासाठी पूरक आधारही ठरेल. एस.एम. देशपांडे, शिक्षण सहसंचालक