आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन्ही आघाड्यांसमोर अपक्षांचे तगडे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आघाड्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पालिकेच्या एकूण १७ प्रभागातील नऊ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. या लढतींमध्ये आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता निवडणूक दिग्गज जिंकणार की नवखे बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग एक मधील पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अक्षय गंगेकर काँग्रेसचे संतोष धोत्रे यांना अपक्ष प्रदिप पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर चांगलीच टक्कर दिली आहे. प्रभाग एक मधील शिवसेनेच्या रेशमा कवडे काँग्रेसच्या रंजना फडतरे यांच्यासमोर अपक्ष माजी नगराध्यक्षा राजश्री गंगेकर यांचे आव्हान आहे. पाच भाजपचे अनिल अभंगराव काँग्रेसचे बाबासाहेब लगरकर यांची अपक्ष मुबारक आतार यांनी चांगलीच दमछाक केली आहे. , विकासाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. नऊ पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या लतिका डोके काँग्रेसच्या रतन मस्के यांच्या पुढे आपल्या अपक्ष राजश्री तारापूरकरयांनी आव्हान दिले आहे. प्रभाग दहा मधील कॉग्रेसच अर्जुन चव्हाण आघाडीचे सुनील डोंबे यांच्यासमोर नवखे अपक्ष उमेदवार संदीप पवार यांचे आव्हाने आहे.प्रभाग पंधरा मधील आघाडीचे जितेंद्र बनसोडे कॉग्रेसचे महादेव भालेराव यांना अपक्षाचे महेश कसबे यांनी आव्हान उभे केले आहे , सोळा दिपक येळे विवेक परदेशी यांना रामचंद्र राऊत ( अपक्ष ) यांचा सामना करावा लागत आहे.

पुत्रासाठी माजी नगराध्यक्षांची
प्रतिष्ठा लागली पणाला
प्रभागएक मध्ये माजी नगराध्यक्ष प्रताप गंगेकर यांचे सुपुत्र अक्षय गंगेकर विरुध्द माजी नगराध्यक्ष सुरेखा पवार यांचा मुलगा प्रदीप पवार यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. प्रभाग अकरा मधील विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल साबळे विरुद्ध माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांच्यांत काट्याची टक्कर आहे. प्रभाग चार मध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, विद्यमान नगरसेवक विक्रम शिरसट धनंजय कोताळकर यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. सात मध्ये रेहाना बोहरी लक्ष्मी कदम या दोन्ही विद्यमान नगरसेविकांना अपक्ष उमेदवार शोभा जाधव यांचा सामना करावा लागत आहे. सोळा मधील काँग्रेसच्या अनुजा पवार पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या अपर्णा फत्तेपूरकर यांच्यांसमोर अपक्ष रेणुका घोडके यांनी आव्हान उभे केले .
बातम्या आणखी आहेत...