आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळ ७७, माढा ८१, माळशिरसला ८२ टक्के मतदान, राजकीय बदलाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- मोहोळ नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी चुरशीने ७७.६८ टक्के मतदान झाले. एकूण १७३८७ मतदारांपैकी १३५०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त मतदान प्रभाग १६ मध्ये ८५ टक्के तर सर्वात कमी प्रभाग नऊमध्ये ६९.७१ टक्के झाले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान सर्वच पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.

सकाळी ७.३० पासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत १६.८१ टक्के मतदान झाले. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक मतदारांनी सकाळीच मतदान केेंद्रावर हजेरी लावली. दुपारी १.३० ला ५४. ७७ टक्के मतदान झाले होते. तर ३.३० पर्यंत ६६ टक्के आकडा गाठला होता. दुपारी चारनंतर ऊन कमी होताच पुनश्च मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपर्यंत ७७.६८ टक्के मतदान झाले होते. ९१६७ पुरुष मतदारापैकी ७१३३ तर ८२२० स्त्री मतदारापैकी ६३७३ इतक्या मतदारांनी मतदान केले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

प्रभागनिहाय मतदान
प्रभागएक ८५.०३, दोन ८४.६३, तीन ८३.७५, चार ८१.९०, पाच ८९.१०, सहा ८३.०६, सात ७७.४४, आठ ७१.५८, नऊ ८२.२४, दहा ७९.६३, अकरा ८४.४२, बारा ८३.३८, तेरा ८०.४७, चौदा ८१.९३, पंधरा ७९.८५, सोळा ८६.६८, सतरा ७९.३२.
माढा नगरपंचायत
माढा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. निवडणुकीत सरासरी ८१.३० टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. सकाळी आठपासून मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. पंचरंगी लढती झालेल्या या निवडणुकीत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. १७ प्रभागातील १७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्या-त्या प्रभागात मतदान केंद्र उभारल्याने मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याने सकाळी ११ पर्यंत ५० टक्के तर दुपारी साडेतीन पर्यंत ६८ टक्के मतदान झाले होते.
प्रभाग एक ७९.४७%, दोन ९०.९८%, तीन ८९.८४%, चार ९०.२७%, पाच ८९.६५%, सहा ७६.४२, सात ८३.३३%, आठ ८६.९९, नऊ ७७.१६%, दहा ७८.६१% अकरा ७४.८३%, बारा ८०.१५% , तेरा ७५.१२%, चौदा ७९.५५%, पंधरा ८२.५१%, सोळा ८९.६३%. सतरा ८६.७६%.
माळशिरस नगरपंचायत
माळशिरस नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी ८२.४८ टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान शांतेत पार पडले. सर्वाधिक मतदान प्रभाग दोनमध्ये ९०. ९८ तर सर्वात कमी मतदान प्रभाग ११ मध्ये ७४.८३% झाले. नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून मतदानाला वेग आला होता. सर्वच ठिकाणी मतदाराच्या रांगा लागल्याच्या दिसून आल्या. दुपारी बारा पूर्वीच सर्वत्र ५०% मतदान पूर्ण झाले होते. त्यानंतर मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता.

प्रभागनिहाय मतदान
प्रभागएक ८०.२४, प्रभाग दोन ८०.७३, प्रभाग तीन ७६.५८, प्रभाग चार ७७.७९, प्रभाग पाच ८४.४०, प्रभाग सहा ७६.७८, प्रभाग सात ७७.९४, प्रभाग आठ ७२.५९, प्रभाग नऊ ६९.७१, प्रभाग दहा ७५.८४, प्रभाग अकरा ७९.३८, प्रभाग बारा ७७.१५, प्रभाग तेरा ७१.०३, प्रभाग १४ ८४.६०, प्रभाग १५ ७८.८७, प्रभाग १६ ८५.८७, प्रभाग १७ ८३.७०