आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहीर प्रचार आज संपणार, आता वैयक्तिक भेटीतून मतदारांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पहिल्याटप्प्यात रविवारी (दि.२७) होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि.२६) रात्री थंडावणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली असून जिल्हाभरातील नगराध्यक्षपदाच्या नगरसेवक पदाच्या १६६ सदस्यांसाठीच्या मतदानाकरता एकूण २८६ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी दुपारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शेवटचे ट्रेनिंग पार पडले असून शनिवारी दुपारी साहित्यवाटप केले जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पालिका निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी रात्री थंडावणार आहे. गेल्या महिनाभरात प्रचार, आरोप-प्रत्यारोप तसेच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या गाठीभेटीने शहरी प्रभाग ढवळून निघाले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांकडून मतदान करून घेण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली असताना दुसरीकडे रविवारी होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसह दुसऱ्याच दिवशीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब, उमरगा, मुरूम, भूम, परंडा नळदुर्ग या आठ नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. यासाठी मतदान प्रक्रियेकरता आवश्यक मतदान केंद्राची निवड, तेथील व्यवस्था, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक अशा सर्व प्रक्रिया शुक्रवारी अंतिम करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना तीन प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. तसेच सर्व केंद्रांना शनिवारी दुपारी १२ वाजेपासून मतदान केंद्रावरील साहित्याचे वाटप करण्यास प्रारंभ होणार आहे.

उस्मानाबादेत मतमाेजणीच्या १० टेबलावर १२ फेऱ्या : नगरपालिकेतील नगराध्यक्ष ३९ नगरसेवकांसाठी होत असलेल्या मतदानाकरता १०५ केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी केंद्रावर ६०० कर्मचारी तर १० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पथकं कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर पोलिसांच्या स्ट्राइकींग फोर्स दिवसभर प्रभागामध्ये मतदान केंद्राना भेटी देत फिरत राहणार आहेत. उस्मानाबादेत संवेदनशील मतदारसंघांची नोंद नसली तरी विशेष बाब म्हणून १२ मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त तसेच निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.

१० टेबलवर ११ फेऱ्यांमध्ये मतमोजणी
उस्मानाबादेत आयुर्वेदिक महाविद्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. १० टेबलवर एकूण ११ फेऱ्या होणार आहेत. एका मतदान केंद्रात इव्हीएम यंत्रणेवर सर्वात वर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे येणार आहेत. त्यानंतर प्रभागातील प्रथम (आरक्षित) नंतर आणि असेल तर अशी उमेदवारांची क्रमवारी राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...