आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये ते नऊ तासांचे भारनियमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद  - राज्यभरात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी भारनियमन करण्यास महावितरनने प्रारंभ केला आहे. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीपासूनच तब्बल ५६ गावांमध्ये ते तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यातच सध्याच्या विजेच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कृषीपंपाना होणारा वीजपुरवठा १० तासांवरून तासांवर आणण्यात आला असून अगोदरच भारनियमन आणि त्यातच सतत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 
 
उस्मानाबाद जिल्ह्याला २५० मेगावॅट विजेची गरज असून त्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने सध्या ग्रामीण तसेच काही शहरी भागात विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८४ फिडरद्वारे औद्योगिक, कृषीपंपासह घरगुती वापराकरीता वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी उस्मानाबाद तुळजापूर असे दोन विभाग कार्यरत असून उस्मानाबाद अंतर्गत कळंब, उस्मानाबाद, वाशी, भूम परंडा या तालुक्यांचा तर तुळजापूरमध्ये लोहारा, उमरगा तुळजापूर या तालुक्यांचा समावेश आहे. 

उस्मानाबादला परळीच्या थर्मल पावर स्टेशनमधून प्रामुख्याने वीजपुरवठा केला जातो. सध्या राज्यात हजार मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्याने चांगलीच धावपळ उडाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खासगी उद्योजकांकडूनही वीज खरेदी केली जात असून अनेक ठिकाणी भारनियमन वाढविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याालाही याचा फटका बसला असून अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खंडित स्वरूपात मिळणारी १० तासांची वीज आता तासांवर करण्यात आली अाहे. 

तसेच पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ५६ फिडरवर कुठे विजेच्या गळतीमुळे तर कोठे वसुली नसल्याने ते तासांचे भारनियमन सुरू आहे. त्यातच या विजेच्या तुटवड्यामुळे आणखी भर पडल्याने शहरी भागात जास्त परिणाम झालेला नसला तरी ग्रामीण भाग मात्र येत्या काळात भारनियमनाने होरपळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

२२फिडरवर वसुलीअभावी भारनियमन: जिल्ह्यातएकूण ८४ फिडर अाहेत. या फिडरचे ए,बी,सी,डी, इ, फ, जी १,जी २,जी अाणि झेड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. 
जे फिडर ते डी मध्ये मोडतात त्या ठिकाणी भारनिमयन होत नाही. परंतु, त्यानंतरच्या सर्व फिडरवर कमी अधिक प्रमाणात भारनियमन केले जाते. त्यातच झेड क्रमवारीतील भारनियमन जेथे थकबाकी जास्त तेथे केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ झेड वर्गीकरण असलेले फिडर असून जी झेड या फिडरवर सर्वाधिक म्हणजे सुमारे नऊ तासांचे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले. 

शेतकऱ्यांना फटका 
जिल्ह्यात कृषीपंपाना १० तास वीजपुरवठा व्हायचा. तोही बहुतांशी मध्यरात्रीनंतर होत असल्याने शेतकऱ्यांची अक्षरक्षा झोप उडाली होती. त्यातच विजेची तूट निर्माण झाल्याने हा भारनियमनाचा कालावधी दोन तासांनी वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...