आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभी तो कुछ बता नही सकते, सूचना आने के बाद पैसे देंगे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता निकष तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याने शासनाने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रत बुधवारी (दि.१४) सायंकाळी मंत्रालयातून प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना अशा स्वरूपात मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी (दि.१५) दिवसभर राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यंाना मदत दिली जाते का, याचा शोध घेतला. मात्र, एकाही बँकेने शेतकऱ्याला १० हजार रुपयांची मदत दिली नाही. उलट बँकेचे अधिकारी ‘अभि तो कुछ नही कह सकते, सूचना आने के बाद देखेंगे’, असेच सांगत होते. त्यामुळे शासनाचे आदेश कधी मिळणार आणि त्यानंतर शेतकरी मदत कधी उचलणार, पेरणी कशी होणार, असा प्रश्न पडला आहे. 
 
कर्जमाफीवरून आंदोलन पेटल्यानंतर शासनाने शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीसोबत चर्चेसाठी मंत्री गटाची निवड करून आंदोलनाची दाहकता कमी करण्यासाठी पावले उचलली. यानंतर महसूलमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केला. मात्र, या घोषणेदरम्यान त्यांनी तत्वत:, निकष पाळून सरसकट कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रत्येकी १० हजार रुपये तातडीने मदत स्वरूपात द्यावेत, अशी मागणी केली होती, मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करत बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये रक्कम देण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील लेखी आदेश बुधवारी सायंकाळी निघाले. मात्र, गुरुवारपर्यंत बँकांपर्यंत शासनाचे आदेश पोहोचलेेच नाहीत. पाहणीनंतर बँकांनी शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे टाळल्याचे समोर आले. 

खरीप शेतकऱ्यांचा मुख्य पिकांचा हंगाम असतो. या काळात पेरणी करून शेतकरी वर्षभराची स्वप्ने पाहतो. त्यांना बियाणे, खतांसाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवले जातात. यावर्षी मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांना आधार वाटला होता. मात्र, शासनाने कोणाला कर्जमाफी द्यायची, याबाबतचे धोरण अद्याप ठरविलेले नाही. हे ठरविण्यासाठी शासनाला वेळ हवाय. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तात्पुरती मदत देण्याची घोषणा झाली; मात्र, शेतकऱ्यांचा आता बँकेवरचा आणि शासनावरचाही विश्वास उडत चाललाय. मदत मिळण्यासाठी किती अटींची पूर्तता करावी लागते, यावरच मदतीची आशा आहे. मात्र, आता चांगल्या पावसाने जमिनीत ओल तयार झाली आहे. पेरणीची लगबग असताना आता पेरणी करायची की बँकेत चकरा मारायच्या असा प्रश्न त्याच्यासमोर उभा अाहे. 
बातम्या आणखी आहेत...