आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी दोनशे कोटींहून अधिक रुपयांच्या ऊर्जास्रोताची होते राख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - शासनाची उदासीनता आणि शेतकऱ्यांचे अज्ञान यामुळे दरवर्षी जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ऊर्जास्रोताची राख होत आहे. पीक काढणीनंतर लाखो टन सेंद्रिय अवशेष जाळले जात आहे. यामुळे शेतजमीन खतापासून वंचित राहत आहे. तसेच प्रदूषण वाढण्यास मदत होत आहे. त्याचा मानवासह वन्यजीवावरही अनिष्ट परिणाम होत आहे. शासनाने याबाबत धोरण ठरवल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळणार आहे. 
 
उसाचा हंगाम संपला आहे. तोडणीनंतर त्याचे पाचट पेटवून दिले जायचे. गेल्या काही वर्षांत शेतकरी ते ठेवत आहेत. त्यामुळे खोडव्याला फायदा होतो, सिध्द झाले आहे. कोल्हापूर विभागातील काही कारखाने पाचट ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर काही रक्कम द्यायचे. पाचट कुट्टीची ट्रॅक्टरवर चालणारी यंत्रेही बाजारात उपलब्ध झाली. त्यामुळे आच्छादन राहून ते कुजल्याने पिकाला सेंद्रिय खत मिळते. तणनियंत्रणही होते. मात्र, उंदराचा होणारा प्रादुर्भाव आणि मशागतीस अडचण येत असल्याचा शेतकऱ्यांचा गैरसमज असल्यामुळे खोडवा ऊस पिकानंतर पीक मोडताना पाचट पेटवले जाते. पाचट पेटवल्याने उष्णतेमुळे जमिनीतील शेतीउपयोगी जीवाणूंचा नाश होतो. राख पसरून प्रदूषण होते. उसासह तुरीच्या तुराट्या, गव्हाचे काड हेही जाळले जातात. 

आता उसाचे पाचट गोळा करून त्याच्या गाठी बांधणारी यंत्रे बाजारात अाली आहेत. ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर चालणारी ही यंत्रे दिवसाकाठी दहा एकर क्षेत्रातील पाचटाच्या गाठी बांधतात. या गाठींना फळबागांमधील जैविक आच्छादनासाठी मागणी आहे. कारखान्यांमध्ये बगॅसला पर्याय म्हणून याचा वापर होतो. त्यामुळे पाचट गाठीची विक्री ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्तोत्र होऊ शकतो. त्यासाठीच्या यंत्रासाठी शासकीय अनुदान नाही. त्यामुळे जिल्ह्यात अवघी १७ यंत्रे उपलब्ध आहेत. त्यासाठी धोरण ठरवायला हवे. 

अनुदान देता येऊ शकेल 
^औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण महामंडळ अनुदान देते. कृषी क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठीही उपयोगी पडणाऱ्या यंत्रसामग्रीला अनुदान दिले जाऊ शकते. यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. नवनाथअवताडे, प्रभारी उपसंचालक, प्रदूषण महामंडळ 

धेारणात्मक निर्णय व्हावा 
^पाचटगाठी बांधणी यंत्रासाठी अनुदान नाही. याबाबत धोरणात्मक निर्णय व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकऱ्याला फायदा होईल. पाचटाचा योग्य वापर होईल. बसवराजबिराजदार, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर 

साखर सम्राटांचे दुुर्लक्ष 
^पाचट गाठी बगॅसला पर्याय ठरू शकतो. त्यामुळेच साखरसम्राटांनी जाणीवपूर्वक या व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मेक इन इंडियासारख्या योजनेतूनही या उद्याेगाला मदत केली जाऊ शकते. पाचटाच्या गाठी बांधणाऱ्या यंत्रासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी शासनाचे अनुदान नाही.पाचटाच्या गाठी बांधणे खर्चिक आहे. अप्पासकटे, पाचट बांधणी व्यवसायक 

पाचटाचे अर्थकारण 
हेक्टरउसाच्या तोडणीनंतर १० टन पाचट शिल्लक राहते 
१३ किलोची एक गाठ याप्रमाणे हेक्टरी ७७० गाठी तयार होतात 
२५ रुपये प्रति गाठीचा दर 
२० हजार रुपयांचे उत्पन्न एका हेक्टरमधून मिळू शकते. 
लाख हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात ऊस 
८० टक्के क्षेत्रावरील उसाचे पाचट जाळले जाते 
 
बातम्या आणखी आहेत...