आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदीध्वज मिरवणुकीची शिल्पकृती... सांस्कृतिक वारशाचे जतन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरची सांस्कृतिक ओळख एका शिल्पात मांडण्याची संकल्पना प्राचार्य दीपक पाटील यांनी अनोख्या कलाकृतीद्वारे प्रत्यक्षात आणली आहे. सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाशी नाते जोडणारे शिल्प घराघरांत विराजमान होईल, सोलापूरची आठवण म्हणून एखादे शिल्प भेटीदाखल दिले जावे, ही संकल्पना या शिल्पाद्वारे पूर्ण होईल, असा विश्वास श्री. पाटील यांना वाटतो. सोलापूर म्हटले की चादर आणि येथील सिद्धेश्वर गड्डा यात्रा असेनातेच जुळलेले असते. काठ्यांची यात्रा म्हटले की सोलापूरचे नाते आठवतेच. हाच प्रसंग कलेत उतरवून या सांस्कृतिक वारशाला पाटील यांनी शिल्पबद्ध केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकात सिद्धेश्वर यात्रेचे असे शिल्प बसविण्याची संकल्पना आर्किटेक्ट अमोल चाफळकरांच्या माध्यमातून मांडली होती. मात्र ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

श्री. पाटील हे अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. कलात्मक शिल्पकला हा त्यांच्या छंदाचा, आवडीचा भाग आहे. त्यांनी विविध शिल्पे तयार केली आहेत. यात सुयश गुरुकुलमध्ये श्रीराम पुजारी सभागृहात संगीत वाद्य शिल्प, शिंदे चौकातील मुळीक शिल्प पुतळा ही त्यांचीच कलाकृती आहे. त्याबरोबर हरिभाई देवकरण प्रशालेच्या इमारतीचे हुबेहूब असे ७०० शिल्पमेमोरंडम त्यांनी बनविले.

शिल्पकृतीविक्रीसाठीही : सिद्धेश्वरयात्रा शिल्पकृती विक्रीसाठी ठेवण्याची संकल्पनाही असणार आहे. सुमारे अडीच हजार रुपयांत ही शिल्पकृती उपलब्ध होऊ शकेल. विक्रीसाठी हे शिल्प तयार करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या प्रायोगिक पातळीवर शिल्पकृती बनविली गेली आहे. साेलापूरचा सांस्कृतिक वारसा शिल्पकृतीद्वारे जागता ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

तीन प्रकारांत बनवण्यात आले शिल्प
वास्तववादी,मेटल इफेक्ट, सिंथॅटिक मार्बल या तीन प्रकारांत शिल्प बनवले आहे. या शिल्पाचे माध्यम फायबर आहे.
बातम्या आणखी आहेत...