आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एफआयआर’ नोंदवण्यात जातो वेळ, पुढे तपासाच्या नावाखाली होतो खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील गुन्हेगारीच्या काही घटनांमध्ये पोलिसांकडून एफअायअार दाखल करण्यासाठीही तपासाच्या नावाखाली उशीर केला जात असल्याचे दिसून अाले अाहे. लकी चौकात सापडलेले १७ लाख रुपये असोत किंवा उत्तर सोलापूर तालुक्यातील युवतीची लग्नाअगोदरच झालेली अात्महत्या असो. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये पोलिसांकडून रजिस्टर नोंद करायला उशीर झाल्याच्या अनेक घटना अाहेत. नोंद होत नसल्याने गुन्ह्यातील गांभीर्य कमी होते अाणि मग पुढे या गुन्ह्याचे काय होते हे कळतच नाही. पैसे सापडल्याचे गुन्हे तर इन्कम टॅक्स (अायकर) विभागाकडे वर्ग केले जातात. त्यांच्या तपासानंतरच पुढे काय ते ठरविले जाते.

पोलिसांकडून अनेक गुन्ह्यात एफअायअार नोंदवण्यात खूप वेळ घेतला जातो. अशा अनेक घटना अाहेत. अर्थात या जाणूनबुजून केल्या जातात का? असाच संशय यातून येतो. तपासासाठी वेळ अावश्यक अाहे, पण घटना नोंदवून तपास करणे का जमत नाही हा वेगळाच मुद्दा अाहे. फर्स्ट इन्फर्मेशन रजिस्टर (एफअायअार) अावश्यकच अाहे. विशेष म्हणजे तातडीने त्याची एक प्रत फिर्यादी किंवा संबंधित घटनेतील व्यक्तींना दिली पाहिजे. पण तसे पोलिसांकडून होताना फारसे दिसत नाही. केवळ नोंदी घेणे अाणि तपास करतो अाहोत, असे सांगणे हे अाता नित्याचेच झाले अाहे.

लग्न ठरलेले होते, लग्नाअगोदरच होणाऱ्या पतीने पैसे मागायला सुरुवात केली, पैसे दिले नाहीत तर लग्न करणार नाही असा दम दिला जातो अाणि लग्न होण्याअगोदरच एका युवतीला अापली जीवनयात्रा संपवावी लागते. ती युवती विहिरीत उडी घेऊन अात्महत्या करते. हा प्रकार तोंडी सांगितला जातो. प्रत्यक्षात मात्र पोलिसांच्या नोंदीत केवळ अकस्मात मृत्यू अशी नोंद होते. ती विहिरीत पडून मृत्यू झाली की, अात्महत्या याचा काही तपास लवकर होत नाही अाणि गुन्हाही नोंद होत नाही. कोणाला जबाबदारही धरले जात नाही. त्या युवतीचे पालकही पुढे येत नाहीत पोलिसातही स्वत:हून गुन्हा नोंदवण्यात अाला नाही. ही घटना घडून अाठवडा होऊन गेला

^लकी चौकात सापडलेल्या पैशाबाबत अाम्ही अायकर विभागाला कळविले अाहे. अशा पद्धतीने सापडलेला पैसा हिशेबी अाहे की बेहिशेबी हे ठरविण्याचा अधिकार अायकर विभागाला अाहे. त्यामुळे ते या संदर्भात तपास करीत अाहेत. निवडणूक काळातही पैसे सापडतात तेही अाम्ही अायकर विभागालाच देतो. खरे तर अशा प्रकरणातील पैसे न्यायालयात जमा करून अायकर विभागाला कळविले जाते. पोलिसांना तपासाचे अधिकार नाहीत. शर्मिष्ठा घारगे- वालावलकर (सहायक उपायुक्त, गुन्हे शाखा)

मृताच्या नातेवाईकांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली, त्यांनी तक्रार करणार नाही, असे सांगितले. उगीच अाम्ही कोणावर संशय घेणार नाही, असे नातेवाईक म्हणतात. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. त्यांचा जबाब घेणार, वडिलांचा जबाब घेतला. घटना स्थळांचा पंचनामा झाला अाहे. त्याची पडताळणी होणार अाणि मग पुढील निर्णय होईल, असे पोलिस सूत्राकडून सांगितले जाते.
तपासासाठी वेळ आवश्यक, पण घटना नोंदवून तपास करणे जमत नाही..?
कोणतीही व्यक्ती ६० वर्षाच्या अातील असेल अाणि ती अशा संशयास्पदरीत्या मृत झाली असेल तर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केलाच पाहिजे. ज्यांच्या हद्दीत ही घटना घडली अाहे, त्या पोलिस अधिकाऱ्यांनी यात अापली भूमिका बजावली पाहिजे. अशा घटनेतील मृत्यू हा अनैसर्गिक समजून तपास झाला पाहिजे. नातेवाईकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचीही गरज नाही. तपास करणे अाणि सत्य बाहेर काढणे ही पोलिसांची जबाबदारीच अाहे. तसेच वाहतूक करताना जर पैसे सापडले तर अशा घटनेतही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करणे गरजेचे अाहे.
अायकर विभाग फक्त ते पैसे हिशेबी अाहेत की बेहिशेबी एवढेच ठरवू शकते. पण पैसे कोणाकडून कुठे चालले होते?, ते रीतसर होते का? अादींची तपासणी पोलिसांनीच केली पाहिजे. अायपीसी कोडमधील कलमानुसार पोलिसांची तपासाची जबाबदारी अाहे. अशा प्रकरणात काम करणाऱ्यांच्या अाणि त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यावरही लक्ष ठेवले पाहिजे. तरच यातील सत्य बाहेर येईल.

-अॅड. असीम सरोदे
(कार्यकर्ते, मानवाधिकार)
घटनांकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही? हा प्रश्न महत्त्वाचा
दुसरी घटना शहरातील अाहे, लकी चौकात लाख रुपये घेऊन जाताना एका वाहनाला पकडले जाते. ही घटना अाहे, सायंकाळी सहा वाजताची. वाहनाचा क्रमांक अाहे. चालकाला ताब्यात घेतले अाहे. पण पोलिसांत याची नोंद नाही. ही घटना अायकर विभागाची अाहे, असे सांगून अायकर विभागाला कळविले अाहे. एवढेच उत्तर पोलिसांनी दिले. पण या प्रकरणात वापरलेले वाहन, त्याचा क्रमांक बरोबर अाहे की, चुकीचा क्रमांक लावून वाहन वापरले या बाबत काहीच समोर अालेले नाही. हे पैसे न्यायालयात जमा करून अायटी विभागाला कळविल्याचे समजते. मात्र त्याचीही स्पष्टता दिसत नाही.
आपल्या प्रतिक्रिया: तुमच्यानावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा
पोलिसांच्या सूत्राने सांगितल्यानुसार एखाद्यानेअात्महत्या केली किंवा िवहिरीत पडून जीव गेला तर अशा घटनेत नातेवाईकांनी तक्रार दिली, तरच नोंद केली जाते अाणि पुढील तपास केला जातो. अन्यथा विहिरीत पडून मृत्यू एवढीच नोंद होते. जर संशय अाला किंवा काही संशयास्पद खुणा शरीरावर अाढळल्या तर लगेच संशय बळावतो. अनेक घटनांमध्ये काही दिवसांंनंतर अाजूबाजूच्या नागरिकांचा जबाब घेऊन किंवा काही नोंदी अाढळल्या, पुरावे सापडले तरच मग अात्महत्येस प्रवृत्त केले, ढकलून जीव घेतला असा निष्कर्ष काढून तपास होतो. नातेवाईक दु:खात असतात. त्यामुळे ते तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, असेही अनेक घटनांमध्ये सांगितले जाते. पण त्यामुळे एक गुन्हा झाला असेल तर तो पडद्याअाडच राहतो, उघड होत नाही. याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही किंवा जवळ किती पैसे वाहून न्यावेत, ते कसे असावेत, जवळ पावत्या असाव्यात हे नियम असतानाही त्या जवळ नसतील अाणि ते तसे पैसे सापडले तरीही तातडीने कारवाई होत नाही. लागलीच त्याचा तपास होत नाही. पोलिसांच्या सांगण्यानुसार जवळ किती पैसे बाळगावेत यावर कोणतेही बंधन नाही. अाणि व्यवहारातील पैसे असतील तर ते नेण्यातही वावगे नाही. पण लकी चौकातील घटना वेगळीच अाहे.
तरीही त्या बाबत अजूनही म्हणावी तशी कडक कारवाई किंवा तसा तपास झाला नाही. अशा घटनांकडे पोलिस गांभीर्याने का पाहत नाहीत? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर मात्र पोलिस देऊ शकत नाहीत. पण एकूणच तपास पाहिला, तर संशयास्पद बाबी आढळून येतात. ज्या सामान्य माणसाला सातत्याने प्रश्न विचारणारे ठरतात.
बातम्या आणखी आहेत...