आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या निमित्ताने झेंडे, मफलर बाजार तेजीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर लोकशाहीच्या मंदिरात प्रवेशाच्या तयारीत असलेल्या विविध राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी निवडणूक प्रचारासाठी लागणारे झेंडे, मफलर, टोप्या, बिल्ले बाजारात विक्रीस आले असून तेजीत आहे. 
 
प्रचार काळातील उन्हाची तीव्रता डोळ्यासमोर ठेवून पक्षचिन्हाच्या कापडी टोप्यांना विशेष मागणी आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेल्या नेत्यांच्या मुखवट्यांचे पोस्टर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेत. गळ्यात घालण्यासाठी पक्षचिन्हाचे मफलर, शर्ट, साड्यांसह, बॅचबिल्ले विक्रीसाठी आहेत.
 
 २५० ते ८०० रुपये या डझनाच्या भावामध्ये बॅचबिल्ले नेत्यांच्या मुखवट्यांची विक्री सुरू आहे. रॅलीसाठी लागणाऱ्या दीड ते दोन मीटर लांबीचे पक्षाचे मोठे झेंडे असून त्याचे आकर्षण असल्याचे विक्रेते रमन भुतडा यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...