आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यात येणार एक लाख किलो झेंडू, भाव स्थिर, ३० ते ८० रुपये प्रतिकिलो राहतील दर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बारामहिने बाजारात मिळत असलेल्या झेंडूला गुढीपाडवा, दसऱ्याला भाव चढतो हे तितकेच खरे आहे. येत्या तीन-चार दिवसांत आवक वाढणार असून या दरात फार वाढ होण्याची शक्यता नसल्याने दसऱ्याला फुलांचा तोटा राहणार नाही, असे चित्र आहे.
या वेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने झेंडूचे उत्पन्न वाढले आहे. त्यातच पितृपक्षात पंधरवडाभर फुलांची मागणी घटत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातून झेंडू काढला नव्हता.
हा सर्व झेंडू नवरात्रात बाजारपेठांमध्ये येत आहे. नवरात्रात दर दिवशी बाजार समिती अन्य व्यापाऱ्यांकडे सुमारे १० ते १२ टेम्पो झेंडूची आवक होत आहे. प्रत्येक टेम्पोत साधारणत: साडेतीन ते चार टन झेंडू असतो. दसऱ्याला सर्वच ठिकाणी झेंडूला मोठी मागणी असते. ग्राहकांची सर्वाधिक मागणी लाल-पिवळा तसेच कोलकाता झेंडूला असते.

येथून येतो झेंडू
दक्षिणउत्तर सोलापूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सांगली, सातारा, सांगोला, माेहोळ, बार्शी, पंढरपूर, नाशिक, अहमदनगर आदी

नवरात्रात चार लाख किलो फुले
यंदाहीदसऱ्याला इतक्याच झेंडूची आवक होण्याची शक्यता आहे. यंदा संपूर्ण नवरात्रोत्सवात अंदाजे लाख किलो आवक झाली, तर केवळ दसऱ्याला लाख किलो झेंडू येण्याची शक्यता आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा झेंडू फुलांची आवक् चांगली राहीली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी आहे या वर्षीची आवक