आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलामुळे बाधित इमारतींची यादी तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात जुना पुणे नाका ते पत्रकार भवन हा ७.७० किलाेमीटर तसेच जुना बोरामणी नाका ते जुळे सोलापूर मोरारका बंगल्यापर्यंत ४.९२ किलोमीटर असे १२.६२ किमीचे दोन उड्डाणपूल होणार आहेत. त्यासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मिळकतदार आणि जागा मालकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यासाठी सन २०१७-१८ च्या रेडिरेकनर दरानुसार ११८.८७ कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता सदरची रक्कम शासनाकडून मिळावी यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. याशिवाय डीटीआर, एफएसआय किंवा मोबदला द्यावा लागणार आहे. 
 
शासनाने मदत करावी, महापालिकेचे मत : ६५हजार चौ. मी. भूसंपादनासाठी सुमारे ११८ कोटी लागणार आहे. यात वाढ होऊ शकते. ती रक्कम देण्यास महापालिका असमर्थ असून, शासनाने ती रक्कम द्यावी, असे मत महापालिकेचे आहे. दोन्ही उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मालकी असणार आहे. काही ठिकाणी झोपडपट्या जातील. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रक्कम लागणार आहे. ती शासनाने द्यावी. 

जंक्शन लगत ४१ मीटर रस्ता : १२किमी उड्डाणपूल करत असताना ज्या ठिकाणी शहराच्या अंतर्गत रस्त्यास जोडण्यासाठी जंक्शन करावे लागणार आहे त्या ठिकाणी ४१ मीटरचा रस्ता असणे आवश्यक आहे तर उड्डाणपुलाची रुंदी २१ मीटर इतकी आहे. वळण असलेल्या ठिकाणी एका बाजूने मिळकती बाधित होतील. 

यांच्या जातील जागा : मालकी,खासगी संस्था, पोलिस दल, शासकीय, निमशासकीय, झोपडपट्टी आदी. 

जुना बोरामणी नाका ते शांती चौक, वालचंद काॅलेज, आम्रपाली चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक, महावीर चौक, पत्रकार भवन चौक, जुळे सोलापूर ते माेरारका बंगला (अंतर ४.९२५ कि.मी.) 
जुना पुणे नाका संभाजी चौक ते शिवाजी चौक, मेकॅनिक चौक, भय्या चौक, रेल्वे स्टेशन, डीआरएम कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी ते पत्रकार भवन चौक. (अंतर ७.७ कि.मी.) 
जाईल ६५ हजार चौ. मी. क्षेत्र 

जुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौकापर्यंत खासगी मिळकतीचे २२ हजार ३५९ चौ. मी. तर शासकीय मिळकतीची ५९४७.२५ चौ. मी. अशी २८ हजार २९६ चौ. मी. जागा जाईल. जुना बोरामणी नाक्यापासून ते जुळे सोलापूरपर्यंत खासगी मिळकतीचे ३३ हजार ६४१ चौ. मी. तर शासकीय मिळकतीचे तीन हजार ७३४ चौ. मी. असे ३७ हजार ३७५ चौ. मी. असे एकूण ६५ हजार ६७१ चौ. मी. क्षेत्र जाईल. 

Áजुना पुणेनाका ते पत्रकार भवन - ८३.४७ 
Áमार्केटयार्डते जुळे सोलापूर - ३५.४० 
Áएकूण-११८.८७ 
(सन२०१७-१८ च्या रेडीरेकनर नुसार, दर) 
 
बातम्या आणखी आहेत...