आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: आगीच्या 381 घटना, 1.22 कोटींची मालमत्ता अन् 79 पशूंचे प्राण वाचवण्यात दलास यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील वर्षभरात शहरात ३८१ ठिकाणी आगी लागल्या. त्यात १.८५ कोटी रुपयांचे नुकसान आणि १६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, महापालिका अग्निशामक दलाने १.२२ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ७९ पशूंचे प्राण वाचवले. ही माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी पत्रकारांना दिली. 
 
१४ ते २० एप्रिल अग्निशमन सप्ताह म्हणून पाळला जातो. या कालावधीत जनजागृती, आग विझवण्याची प्राथमिक प्रात्यक्षिके दाखवण्यात येतात. अग्निशामक दलाने वर्षभर केलेल्या कामांची माहिती सांगताना आवटे म्हणाले, मागील वर्षात ३८१ ठिकाणी आगी लागल्या. त्यापैकी ५७ ठिकाणी मदतकार्य पोहोचवणे शक्य झाले. आगीत २६ जण जखमी झाले तर १६ जण मरण पावले. १३२ व्हीआयपी बंदोबस्त केले. 
 
आगामी काळात बाळे येथे दोन आणि देगाव येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. देगाव येथे २८ हजार चौरस फुटांच्या जागेवर केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यात परेड मैदान, चार गाड्या थांबवण्याची व्यवस्था, ३६ जवानांसाठी घरकुलाचा समावेश आहे. शहरात १२ गाड्यांची आवश्यकता असून, आता गाड्या आहेत. अन्य तीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. उंच इमारतीसाठी फायर संच असणे आवश्यक आहे. त्याशिवाय महापालिका बांधकाम परवाना देत नाही, असे आवटे यांनी सांगितले. 
 
महापालिकेचे फायर आॅडिट झाले असून, त्यासाठी आवश्यक असलेले संच आले आहेत. ३२ संच पुढील आठ ते दहा दिवसांत बसवण्यात येणार आहेत. महापालिकेतील मुख्य तीन इमारती आणि झोन कार्यालयात अग्निशमन संच बसवण्यात येणार आहे, अशी माहिती आवटे यांनी दिली. 

अग्निशमन सप्ताहाचे उद््घाटन 
साखर पेठेतील अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी अग्निशमन प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याप्रसंगी महापौर बनशेट्टी म्हणाल्या, “शहरात अग्निशमन दलाकडून चांगली सेवा घडू द्या. या दलाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू.’ या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेविका राधिका पोसा, सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. 
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त प्रात्यक्षिके सादर केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...