आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२.२ लाख घरी मिळेल मोफत गॅस कनेक्शन, दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दारिद्र्यरेषे खालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा जोड (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे लाख २० हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रात ही सुविधा मे महिन्यापासून मिळायला सुरुवात होत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वल योजना असे या योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांसाठी या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक ११ मार्च २०१६ रोजी झाली. या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी मिळाल्याचे दोन दिवसांपूर्वी बीपीसीएलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
सुरुवातीला ही योजना उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ही योजना सुरू होईल. या योजनेमुळे गरिबांच्या घरीही गॅस शेगडी दिसणार असून चुलीतील धुरापासून मुक्ती मिळणार आहे.
- चूल आणिस्टोव्ह आदी स्वयंपाक उपकरणांमुळे महिलांना श्वसन फुफ्फुसाचे विकार जडतात. हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, श्वसनाचे रोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग, घरातच होणारे वायूप्रदूषण त्याचे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
ही लागतील कागदपत्रे :
दारिद्र्यरेषेखालील महिलांना ही सुविधा घेण्यासाठी आधारकार्ड, वाहनपरवाना, मतदान ओळखपत्र, वीज, दूरध्वनी अथवा पाणीपट्टीचे बिल, रेशनकार्ड, बँकेचे पासबुक यापैकी उपलब्ध कागदपत्रांद्वारे याचा लाभ घेता येईल. या कनेक्शनमध्ये गॅसची एक टाकी, शेगडी, होसपाईप रेग्युलेटर मोफत देण्यात येणार आहे.
योजनेमागील उद्देश
- चुलींमुळेहोणाऱ्याप्रदूषणापासून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, तसेच महिला सबलीकरण म्हणून दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत कनेक्शन दिले जाणार आहे.

- पहिल्यावर्षातत्यासाठी अर्थसंकल्पात हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. पहिल्या वर्षात कोटी ५० लाख कनेक्शन दिली जातील तर तीन वर्षाच्या कालावधीत ही संख्या कोटींवर जाणार आहे.