आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईचे क्रेझी फंडे, तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा याराना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - आॅगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. केवळ हातावर बँड बांधून, चॉकलेट - गिफ्ट देऊन मैत्री साजरी करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून हा फ्रेंडशिप डे साजरा करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मैत्री आहेच, ती आणखी वेगळ्या पद्धतीने साजरी करीत सामाजिक उपक्रम राबवण्याचे प्रयत्न असतील. निसर्गाशी नाते जोडणे असो, वृक्षांना राख्या - फ्रेंडशिप बँड बांधणे असो. असे विविध फंडे या फेंडशिप डेनिमित्त आयोजिले आहेत. 
 
सोशल मीडियावरही उपक्रमांचे आवाहन करण्यात येते आहे. त्यात सहभागी होण्याचा आग्रह धरला जातोय. एकमेकांना शुभेच्छा देत मैत्री दिनाचा उत्सव साजरा होणार आहेच. त्याशिवाय आणखी वेगळ्या पद्धतीने मैत्री दिन सााजरा करीत सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. फ्रेंडशिप डेनिमित्त महागडे फ्रेंडशिप बँड घेण्यापेक्षा अनाथ गरीब मुलांना वही पेन पुस्तक खाऊ वाटप करून त्यांच्याशी मैत्री नाते करता येईल का? असे अावाहनही यानिमित्त करण्यात येते आहे. 

सोशल मीडियावर फ्रेंडशिप डेच्या विविध चर्चेत तरुणाईने आपापले मत पोस्ट करीत दोन्ही बाजू स्पष्ट केल्या. चर्चेत अनिल पाटील म्हणतात, दोस्ती हर रिश्तेसे आगे हंै... मात्र हा उत्सव आता व्यावसायिक रूप घेत चालला आहे. हा डे साजरा करणे, त्यातून होणारी आर्थिक उलाढाल चांगल्या नात्याला व्यावसायिक बनवत आहे. खरे तर तेरे जैसा यार कहां... कहां ऐसा याराना.. असे म्हणून मैत्र जपण्यापेक्षा ही वैयक्तिक स्तरावरील नाती उत्सवी बनत आहेत. सोशल मीडियावरही व्यावसायिक पद्धतीने या नात्याला मांडले जात आहे. 

बंदीवरही झडली चर्चा 
फ्रेेंडशिपडे काही ठिकाणी उत्सवी स्वरूपात, कमर्शिअल स्वरूपात आयोजिला जात आहे. यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्वाती भोसले लिहितात की, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे यावर बंदीच आणली पाहिजे. डे साजरे करण्यापेक्षा असे काही करा की, जग तुमच्यावर प्राऊंड फिल केले पाहिजे. 
 
बातम्या आणखी आहेत...