आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहूल गणेशोत्सवाची : ‘GST’ मुळे मूर्ती 20 % महाग, बाप्पा परप्रांतात निघालेही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेशमूर्ती रंगवण्याचे काम अंंतिम टप्प्यात आले आहे. - Divya Marathi
गणेशमूर्ती रंगवण्याचे काम अंंतिम टप्प्यात आले आहे.
सोलापूर - गणेशमूर्ती रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांवर १८ टक्के ‘जीएसटी’ (वस्तू, सेवाकर) लागू झाला. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीआेपी) या कराच्या आकारणीपूर्वीच खरेदी केली. पण कारागिरांच्या मजुरीत यंदा खूप वाढ झाली. त्यामुळे गणेशमूर्ती यंदा सरासरी २० टक्के महाग होतील, असे मूर्तिकारांनी सांगितले. 
 
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मूर्तिकार बांधवांचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले. रंग आणि इतर रसायनांची खरेदी जुलैनंतर झाली. त्यामुळे अधिक पैसे मोजावे लागले. पीआेपीची खरेेदी जानेवारी आणि फेब्रुवारीत असते. हा प्रमुख कच्चा माल ‘जीएसटी’तून सुटला. अन्यथा मूर्ती निर्मितीच्या खर्चात अधिक वाढ झाली असती. कारागिरांचा तुटवडा आणि त्यांची मागणी पाहून सर्वच मूर्तिकारांनी त्यांच्या मजुरीत वाढ केली. मूर्ती महागण्यात त्याचेही एक कारण असल्याचे मूर्तिकार सांगतात. 
 
बाप्पा परप्रांतात निघालेही : सोलापूरच्या गणेशमूर्तींना दक्षिण भारतात अधिक मागणी असते. हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठ्या मूर्तींची नोंदणी करतात. त्याची तयारी राजू गुंडला, दीपक वईटला, मंजुळे बंधू आदी मूर्तिकार बंधू करत आहेत. या महानगरांतील व्यापारी येथील छोट्या मूर्ती नेऊन तिथे विकतात. अशा मूर्ती मोठ्या प्रमाणात परप्रांताकडे निघाल्याचेही चित्र आहे. 
 
शहरातील दत्तनगर, अशोक चौक, विडी घरकुल, घोंगडे वस्ती आदी भागात छोट्या मूर्तींचे काम मोठ्या जाेमात सुरू आहे. 
 
२५ फूट उंच मूर्ती हैदराबादसाठी... 
सर्वात उंच मूर्ती बनवण्यात हातखंडा असलेले दीपक वईटला यंदा २५ फूट उंच मूर्ती बनवत आहेत. हैदराबाद येथील काटेदान परिसरातील सार्वजनिक मंडळाने त्याची नोंदणी केली. ही मूर्ती सोलापूरहून नेणे जोखमीचे अाहे. त्यासाठी विशेष क्रेन हैदराबादहून येत असल्याचे दीपक वईटला यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...