आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वालवडला 19 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालवडला मंडळाने घेतलेल्या स्पर्धेत मुलींनी सुरेख रांगोळ्या साकारल्या. - Divya Marathi
वालवडला मंडळाने घेतलेल्या स्पर्धेत मुलींनी सुरेख रांगोळ्या साकारल्या.
वालवड - भूमतालुक्यातील वालवड येथे मागील १९ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यंदाही येथे लहान मुले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे दररोज आयोजन करण्यात येत आहे. 
 
१९९८-९९ मध्ये ही संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यात सर्वप्रमथम वालवड येथे ही संकल्पना राबविण्यात आली. त्यावेळी वालवडने विभागीय स्तरावर यासाठी प्रथम क्रमांक पटकावला होता. यासाठी मंडळाला ११ पुरस्कार मिळाले आहेत. या संकल्पनेमुळे गावात एकता वृद्धींगत होण्यास मदत झाली आहे. 
 
वालवाडला श्री वाल्मीकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. उत्सवाात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहिमेचा यात अंतर्भाव असतो. येथे एक गाव एक गणपती संकल्पाना राबविण्यात मुस्लिम समाजातील रियाज तांबोळी यांचा सिंहाचा वाटा आहे. पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत ते गणेशोत्सवात सहभाग घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. 
 
लहानमुले, विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ : गणेशोत्सवातवालवडला मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी टिपऱ्या, संगीत रांगोळी, संगीत खुर्ची, स्लो सायकल, धावणे, निबंध वक्तृत्व स्पर्धा, नकला, नृत्य, सामान्य ज्ञान, दोरीवरच्या उड्या यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या व्यासपीठाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. यामुळे मंडळाच्या उपक्रमात पालकांचा सहभागही वाढला आहे. 
 
खर्च टाळून सामाजिक कार्य 
यावर्षी मिरवणुकीचा खर्च टाळून बचत झालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी सांगितले. 
 
वर्गणीमुक्त उत्सव 
श्री वाल्मीकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने वर्गणीमुक्त गणेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामस्थ व्यापाऱ्यांना वर्गणी मागता मंडळातील सदस्य स्वत:चे पैसे घालून उत्सवकाळातील खर्च करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...