आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश कुलकर्णी खून खटलाः ज्योतीताईंच्या डोळ्यात अश्रू; हायकोर्टात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य शासनातर्फे दिला जाणारा २०१० चा कृषिभूषण पुरस्कार विजेते गणेश कुलकर्णी यांचा खून गावातील राजकीय वैमनस्यातून झाल्याची फिर्याद पत्नी ज्योती कुलकर्णी यांनी पोलिसांत दिली होती. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. निकाल ऐकल्यानंतर ज्योतीताई कुलकर्णी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या प्रकरणी हायकोर्टात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलकर्णी यांचा राजकीय वर्चस्व संदीप पाटील यांच्या गटाला पाहवत नव्हते. गणेश कुलकर्णी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत होते. राजकीय वैमनस्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला होता पण, न्यायालयात तो सिद्ध झाला नाही.
खून खटल्यातील महत्त्वाचे मुद्दे...
-संशयित संदीपपाटील, संतोष कदम, सिद्धेश्वर पाटील यांना मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला नाही. त्यामुळे तिघे निकालापर्यंत कारागृहातच होते.
-सरकारपक्षातर्फे२९ साक्षीदार तपासण्यात अाले.
-२१एप्रिल२०१४ रोजी साक्षीदार जबाब सुरू झाले.
-२९वेसाक्षीदार पोलिस निरीक्षक शेवाळे यांचा सप्टेंबर २०१५ ला जबाब.
-१६नोव्हेंबर२०११ रोजी अारोपींचा जबाब पूर्ण.
-१२एप्रिलरोजी निकाल झाला नाही, २५ एप्रिल रोजी निकाल देण्याचे जाहीर केले.
-दीपकपाटील,अण्णासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, महादेव कदम, सुरेश पाटील (रा. उपळाई) यांच्याविरुद्ध पुरावा मिळाल्यामुळे सीअारपीसी कलम १६९ प्रमाणे सोडून देण्यात अाले. तसा अहवाल न्यायालयात सादर करण्यात अाला.

कोण काय म्हणाले...
फिर्यादीज्योती कुलकर्णी न्यायालयावरअामचा विश्वास अाहे. हायकोर्टात अपील करणार अाहे. अारोपींना शिक्षा होईल, असे वाटले होते. पण निकाल विरोधात गेला.

विशेषसरकारी वकील अंदोरे - निकालअपेक्षित नव्हता. हायकोर्टात अपील करणार अाहोत.
अॅड.भारत कट्टे - सरकारपक्षाने मांडलेले पुरावे, साक्षीदार यांच्यावर न्यायालयाने विश्वास ठेवला नाही. न्यायालयात गुन्हाही शाबीत झाला नाही.

अॅड.मिलिंद थोबडे - याखटल्यात वैद्यकीय पुरावा विसंगत होता. गाडीने धडक देऊन खून केल्याचा बनाव करण्यात अाला. हा पुरावा बनावट होता. त्यामुळे न्यायालयात अारोप सिद्ध झाले नाहीत.