आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या पाण्याऐवजी बोअरचा पर्याय होता योग्य, महापालिकेची तयारी पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती भागात गणेश विसर्जनासाठी असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावातील दोन कुंडांमध्ये मागील तीन दिवसांपासून पालिका प्रशासन स्वच्छ पाणी टाकण्याचे काम करीत आहे. हेच पाणी बोअरचे वापरले असते तर योग्य झाले असते. पिण्याचे पाणी तेवढेच वाचले असते, अशा प्रतिक्रिया शहरातील मान्यवरांनी व्यक्त केल्या अाहेत. 
 
गणेश विसर्जन जवळ अाल्यानंतर पालिकेला गणेश विसर्जन कुंडाबद्दल जाणीव झाली. तलावातील कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी जमा झाले आहे, हे समजल्यावर या हालचाली सुरू झाल्या. यासाठी तीन दिवसांत तब्बल ५० लाख लिटर पिण्याचे पाणी आतापर्यंत गणपती घाट विष्णू घाट या कुंडांमध्ये सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरावर नेहमीच जल संकट असताना पिण्याचे पाणी सोडले गेले. हे पाणी सोडण्याने काहीच नुकसान झाल्याचा दावा मनपा करते अाहे. सिद्धेश्वर मंदिर तलावातील कुंडामध्ये गणेश विसर्जनासाठी पाणी सोडले आहे. 
 
बोअरचे कामी यश का आले नाही?  
साडेचार इंची बोअर २०० फूट मारला. त्याला इंच पाणी लागले. नंतर तो पुरवठा कमी झाल्याने येथे असणाऱ्या जलवाहिनीतून पाणी सोडत आहोत. १० लाख लिटर म्हणजे एमएलडी पाणी हाेय. तसेच आतापर्यंत रविवारी रात्री १२ पर्यंत तलावात ०.८ एमएलडी म्हणजे आठ लाख लिटर पाणी सोडण्यात आले आहे. तीन दिवसापासून विष्णू घाटाला २० लाख लिटर पाणी सोडले आहे. 
 
असा आहे सोडण्यात अालेल्या पिण्याच्या पाण्याचा हिशेब 
गणपती घाट येथे २० लाख लिटर 
विष्णू घाट येथे ३० लाख लिटर 
अशाप्रकारे ५० लाख लिटरचे हजार युनिट 
बातम्या आणखी आहेत...