आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा मक्तेदार ‘यशश्री’ला नोटीस, ग्लोबलचा मक्ता रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  महापालिकेकडे असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे शहरात स्वच्छता करू शकतो. त्यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग घेऊन शहर स्वच्छ करण्यासाठी काम करण्याची तयारी महापालिका आयुक्तांनी केली. शहरात कचऱ्याचे खासगीकरण करण्यात आले. त्यांनी वेळेत आणि व्यवस्थित काम केले नाही म्हणून यशश्री एंटरप्रायझेस कंपनीस महापालिका आयुक्तांनी मंगळवारी नोटीस बजावली. १५ दिवसांत उत्तर देण्याचे नमूद केले. तर ‘ग्लोबल’चा मक्ता रद्द करण्यात केला आहे. 
 
झोन क्रमांक ते चा घनकचरा मक्ता मार्च रोजी यशश्री एंटरप्रायझेस कंपनीस देण्यात आला. त्यापैकी त्यांनी पाच आणि सहा झोनमध्ये काम सुरू केले. कराराप्रमाणे काम केले नाही. डोअर-टू-डोअर कचरा संकलन केला नाही. बाजारपेठेतील कचरा उचलला नाही. याबाबत महापालिकेस वारंवार कळवणे आवश्यक असताना ते केले नाही. कराराप्रमाणे काम झाले नाही म्हणून आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी मक्तेदारांना सात पानांची नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना १५ दिवसांची मुदत देऊन स्पष्ट केलेल्या कारणाचा खुलासा करणारी कागदपत्रे असल्याची माहिती मागितली आहे. 

‘यशश्री’ला चार झोनचे काम दिले होते. त्यापैकी पाच आणि सहा झोनमध्ये काम सुरू केले तर सात आणि आठमध्ये काम सुरू केले नाही. तेथे काम सुरू करू नये, असे म्हटले आहे. ग्लोबल कंपनीस झोन क्रमांक एक ते चारचा मक्ता देण्याचा निर्णय होता. पण कंपनी महापालिकेकडे करार करण्यास आली नाही. त्यामुळे त्यांना मक्ता देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. 

कचरा निर्मूलनासाठी लाेकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना आपले शहर स्वच्छ राहिले पाहिजे असे वाटले पाहिजे. त्यासाठी जनजागृती आणि मानसिकता आवश्यक आहे. स्वच्छता करत असताना महापालिकेची यंत्रणा असेल तर नागरिक सहकार्य करतील. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी टार्गेट काम करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्तांकडून होताना दिसतोय. शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना स्मार्ट सिटीचा सर्व्हे नागरिकांकडून करण्यात आला. त्यावेळी नागरिकांनी पाण्यापेक्षा स्वच्छतेला प्राधान्य दिले. त्यामुळे नागरिकांना शहर स्वच्छ हवे आहे. त्यासाठी नागरिक पुढे येतील, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. 
सात रस्ता येथील माेदी परिसरातील कचराकुंडी गेल्या आठ दिवसांपासून अशा स्थितीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. कचरा रस्त्यावर पसरलेला आहे. 

स्वच्छतेसाठी महापालिकेकडे यंत्रणा 
^शहरात कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा असून, त्यातून काम करण्यात येईल. कचरा मक्तेदारास नोटीस दिली असून, त्यांच्याकडून १५ दिवसांत उत्तर मागवले आहे.” डाॅ.अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका 
बातम्या आणखी आहेत...