आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकपासून बनवता येऊ शकेल इंधन, अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करता येऊ शकेल, असा प्रकल्प सादर केला.

यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी नागराज उपासे, आनंद लोणारी, सूरज कोरे, शुभम केदारी, गोकूळ पिल्ले यांनी प्रा. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा प्रकल्प सादर केला. सध्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर लोकांकडून स्वीकारला जात नाही. त्यामुळे त्याचा मोठा भार जैविक इंधनावर पडतोय. कचऱ्याची समस्या सुटेल इंधन निर्मितीही या प्लास्टिकपासून करता येईल, असा दावा विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांतर्गत केला आहे.

एका तांब्याच्या भांड्यात प्लास्टिकचे तुकडे टाकून त्याला हवाबंद करायचे. त्याच्या उत्कलनांक बिंदूपर्यंत वितळवून त्याचे बाष्पीभवन केले जाते. यानंतर पाण्यात त्याचा प्रवाह सोडून द्रवरूपातील प्लास्टिक गोळा करता येते. तो कच्चा तेलासम पदार्थ मिळतो. त्याचा वापर इंधन म्हणूनही करता येईल.

इंधन गोळा केल्यानंतर उर्वरित पदार्थ डांबररूपात उरतो. त्याचा उपयोग रस्ताकामासाठी होऊ शकतो. ऑर्किडचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी अभिनंदन केले.
आर्किड अभियांत्रिकीतील विद्यार्थी नागराज उपासे, आनंद लोणारी, सूरज कोरे, शुभम केदारी, गोकुळ पिल्ले यांनी प्रा. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीचा अनोखा प्रकल्प सादर केला.
बातम्या आणखी आहेत...