आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरसह राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा, 6 ते 8 दिवसांची प्रतीक्षा, सोमवारनंतर सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र गॅस उत्पादन करणाऱ्या आखाती देशातील तेल गॅस उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केल्याने गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. शिवाय, जो काही गॅस उपलब्ध झाला आहे तो विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांना देण्यात आल्याने सोलापूरसह पुणे इतर जिल्ह्यांना गॅस सिलिंडर मिळण्यात प्रतीक्षा करावी लागत आहे. आणखी एक आठवडा गॅस सिलिंडर मिळण्यात अशीच स्थिती राहणार असल्याचे गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले. 
 
गेल्या आठवड्यापासून शहरामध्ये स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑनलाइन नंबर लावूनही गॅस मिळत नसल्याचे थेट जिल्हाधिकारी, प्रसारमाध्यमांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या. आणखी चार दिवस वेटिंग राहणार राहील. मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस वेटिंग राहणार नाही. फेब्रुवारीपासून गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे सागर गॅस एजन्सीचे सागर भोमाज यांनी सांगितले. 
 
दोन दिवस अडचण 
- पेट्रोलियम कंपनीने सोलापूर, उस्मानाबाद लातूर येथील वितरकांची बैठक घेतली. वरील कारणामुळे गॅसचा तुटवडा आहे. सोमवारनंतर गॅस मागणीप्रमाणे उपलब्ध होईल. येत्या दोन दिवसांत उरण येथून गॅस उपलब्ध होईल, असे बैठकीत सांगण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर वेटिंगमध्ये घट होईल.
-सागर भोमाज, सागर गॅस एजन्सी. 
 
कंपन्यांनी घटवले उत्पादन 
आखाती देशातील म्हणजेच इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत या देशतील गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या ओपेक्स संघटनेने गॅसचे उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट केली आहे. दरातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांनी ६० टक्के उत्पादन कमी केल्याने गॅस तुटवडा जाणवत आहे. कंपनीकडील उपलब्ध साठा निवडणुका असलेल्या राज्यांना वळवण्यात आल्याने महाराष्ट्रात टंचाई जाणवत आहे. मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येत्या तीन दिवसांत उरण येथून गॅस उपलब्ध होईल, असे पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...