आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016: देशात शांतता, स्थैर्य, पाऊसही समाधानकारक - वासराच्या भाकणुकीचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विदर्भातील घटमांडणीसारखे महत्त्व असलेल्या सोलापूरच्या गड्डा यात्रेतील वासराची भाकणूक नुकतीच झाली. त्यानुसार २०१६ मध्ये भारतात स्थैर्य, शांतता राहील. देशभरात समाधानकारक, चांगला पाऊस होईल, असे संकेत भाकणुकीतून मिळाले आहेत. तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला या भाकणुकीतील संकेताने दिलासा मिळाला आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची जानेवारी महिन्यात संक्रांतीला वार्षिक गड्डा यात्रा भरते. सिद्धपुरुष श्री सिद्धरामेश्वर यांच्या विवाहाचे प्रतीक व कार्याच्या गौरवार्थ ९०० वर्षांपासून दरवर्षी हा सोहळा हाेतो. यात सिद्धारामांचे प्रतीक असलेले २५ ते ३० फूट उंच नंदीध्वज असतात. हळद लावणे, अंघोळी, अक्षता असे विधी परंपरागत पद्धतीने होतात. सतीचे प्रतीक असलेले महा होमप्रदीपनही होते. याशिवाय वासराची भाकणूक हा एक महत्त्वाचा विधी असतो.
भाकणूक अशी असते : वासराची भाकणूक म्हणजे ज्योतिषशास्त्राचा आधार असणारे एक तर्कशास्त्र. यात पाच ते सहा महिन्यांच्या वासरास दिवसभर उपाशी ठेवतात. हे वासरू परंपरेप्रमाणे सोलापुरातील मानकरी देशमुख कुटुंबीयांचे असते. दिवसभर ते दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यातच असते. रात्री ते मंदिरासमोर आणतात. विधीला रात्री १२ला प्रारंभ होतो. वासरासमोर विविध धान्ये, फळे, भाज्या, कडधान्ये, हिरवा चारा, पाणी आदी ठेवले जाते. ज्या वस्तूला ते शिवेल ती वस्तू त्या वर्षी महाग होणार असे भाकीत असते. सर्वप्रथम वासराला अग्निटेंभाने ओवळतात. वासरू बिथरले तर वर्षभरात भूकंप, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती येईल, मूत्रविसर्जन केले तर पर्जन्यमान चांगले आहे, असा अंदाज काढला जातो.
लेखाजोखा मांडणारी परंपरा
ही भाकणूक म्हणजे देशभरात आगामी परिस्थितीचा लेखाजोखा असतो. यंदा पर्जन्यमान चांगले होईल, पण महागाई राहील, असे भाकीत आहे. पाऊस, वातावरण व नैसर्गिक हालचाली याचे हे सांकेतिक भाष्य असते. गतवर्षी वासरू बिथरले होते. नेपाळचा भूकंप हा त्याचा प्रत्यय म्हणू शकता. हे भाकीत तंतोतंत खरे ठरते. आम्ही केवळ अर्थ सांगतो.
शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, भाकणूक सांगणारे पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी
पुढील स्‍लाइडवर वाचा, वासराच्या वर्तणुकीतून भाकणूक..